
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
“केद्रीय गृहमंत्री अमित शहाजी यांनी दिनांक २४ मे २०२६ ला दिल्लीच्या जनजाती सांस्कृतिक मिळाव्यात आदिवासींना वनवासी संबोधून अपमान केल्याप्रकरणी राष्ट्रपतीला निवेदन “
आज दिनांक २९ मे २०२६ शुक्रवारला बिरसा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य संघटनेने जिल्हाधिकारी यवतमाळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,दिल्लीच्या जनजाती संस्कृती मिळाव्यात गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी यांनी त्यांचे भाषणात आदिवासींना वनवासी संबोधून घनघोर अपमान केला आहे.आदिवासी या देशाचे मूळनिवासी आहेत, देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो क्रांतिकारक स्वातंत्र्याच्या लढाईत शहीद झाले. आदिवासीचा इतिहास, संस्कृती महान असतांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी आदिवासींना वनवासी संबोधून त्यांना उपरे ठरवीत आहे.आदिवासी या देशाचे मूळनिवासी असताना त्यांना वनवासी म्हणून हिणवणे आहे हे कितपत योग्य आहे?आदिवासी हे देशाचे नागरिक असताना संविधानिक अधिकार त्यांना बहाल असताना सुप्रीम कोर्ट सुद्धा आपल्या निकालात आदिवासी हे या देशाचे मूळनिवासी आहेत असा वेळोवेळी निर्णय दिला असून अमित शहाजी आदिवासीला वनवासी संबोधुन त्यांचा अपमान करीत आहे, त्यांना आदिवासींना निर्वासित म्हणायचे आहे का? किंवा ते या देशाचे नाहीत? असे त्यांना म्हणायचे आहे का?आदिवासी हे प्रश्न विचारीत आहे. वनवासी शब्दाचा अर्थ परदेशी लागत असताना सुद्धा आदिवासी मूळनिवासी लोकांना वनवासी संबोधून त्यांना जनावरापेक्षाही खालची वागणूक देत आहे. आदिवासी माणस आहेत त्यांनाही स्वाभिमान आहे, अस्मिता आहे, मान आहे सन्मान आहे,तरीपण वनवासी संबोधून त्यांचा अपमान करणे किती योग्य आहे?
वनवासी नहीं, हम आदिवासी है! इस देश के हम मूळनिवासी हैं! असा नारा देत जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या मार्फत योग्य कारवाईसाठी बिरसा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य यवतमाळच्या वतीने महामहीम राष्ट्रपती द्रोपदीजी मुर्म यांना निवेदन देण्यात आले आहे. बिरसा ब्रिगेड चे प्रदेशदाध्यक्ष डॉ.अरविंद कुळमेथे यांच्या मार्गदर्शनाने यावेळी निवेदन बिरसा ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष प्रा.वसंत कनाके यांच्या नेतृत्वात , शामादादा ब्रिगेडचे अध्यक्ष शैलेश गाडेकर, बिरसा ब्रिगेडचे सुमित आत्राम, पंकज मडावी, सुरज मरस्कोल्हे, मधुकर मडावी, तसेच सामाजिक कार्यकर्ते आकाश मेटकर ,सुंदरजी यादव, सौ. मनीषाताई तिरणकर, सौ. विद्याताई परचाके, सौ. सुनंदाताई मडावी,सौ. कल्पना कुळसंगे, सौ. छायाताई मडावी,सौ.लीनाताई बोरकर, सौ.जयश्रीताई मडावी, शंकर कदम, रुपेश मेश्राम, गोपाल घोडाम अजबराव मेश्राम आदींनी दिले. यांच्यासह मोठ्या संख्येने बिरसा ब्रिगेडचे व समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.निवेदनावर सर्वांनी सह्या केल्यात.
