
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
भावगंध सार्वजनिक वाचनालय गुजरी (नागठाणा) यांचे तर्फे सातदिवशीय बाल संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते. दिनांक 21 मे 2026 ते 26 मे 2026 या कालावधीत हनुमान मंदिर सभागृह गुजरी येथे विविध कौशल्यांवर आधारित बाल संस्कार शिबिर सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिक्षिका छायाताई गराड तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुनीलभाऊ गोंडे आणि समस्त सार्वजनिक वाचनालयाचे पदाधिकारी तथा विद्यार्थी पालक यांचे उपस्थितीत संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये गाणी म्हणणे, श्लोक,भजन, प्राणायाम, योगाभ्यास ,कार्यानुभव, चित्रकला ,तथा खेळ ,पाककृती अशा विविध विषयांवर प्रत्यक्ष कृतीद्वारे मार्गदर्शन करण्यात आले श्री सुनील गोंडे आणि श्रीमती छायाताई गराड यांनी विद्यार्थ्यांच्या विविध ऍक्टिव्हिटी करून घेतल्या समारोपीय कार्यक्रम दिनांक 27 मे 2026 ला हनुमान मंदिर सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सन्माननीय मधुकरराव घोटेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय रामचंद्रजी शिरपूरकर ,श्री किशोर भाऊ लांजेवार,श्री भाऊरावजी वऱ्हाडे, श्री गजाननराव भोयर यांचे उपस्थितीत. शिबिरात सहभागी चिमुकल्यांना प्रमाणपत्र ,वही मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाला सतत सात दिवस तब्बल 35 विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदवली कार्यक्रमाचे वेळी मान्यवरांनी भाषणातून मार्गदर्शन केले. या समारोपीय कार्यक्रमात शिबिरार्थी कु सानवी कारमोरे हिने प्रास्ताविक केले ,आभार प्रदर्शन कु ऋतुजा भोयर तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु पूर्वा गोंडे हिने केले .या कार्यक्रमाला विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
