
ढाणकी: . प्रतिनिधी,प्रवीण जोशी ढाणकी
गांजेगाव , सोईट शिवारातील शेतकऱ्यांनी काही दिवसापूर्वी विद्युत पुरवठा हा पूर्ण पने बरोबर न होता विद्युत सतत दहा ते पंधरा मिनिटात येत जात राहणे याने शेत सिंचन कशे करावे. याला कंटाळून व शेतकऱ्यांची दैनिय अवस्था पाहून गांजेगाव व सोइट शिवारातील शेतकऱ्यांनी विद्यमान आमदार नामदेव ससाणे व भाजपा जिल्हा अध्यक्ष्य नितीनजी भुतडा यांना विद्युत अविरत मिळत नसल्याने व दिवसाच्या लाईनला दहा ते पंधरा मिनिटात विद्युत गुल होत असल्यामुळे निवेदन देण्यात आले होते. व तसेच सिंहझेप वृत्तपत्रात तशा बातम्या प्रसारित झाल्यामुळे विद्यमान आमदार नामदेव ससाणे व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीनजी भुतडा यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन नव्याने पाऊल उचलत सदर मागणीला प्रतिसाद देत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडवणीस साहेब यांना ३३के. व्ही सबस्टेशन देण्यात यावे अशी मागणी पत्रकात करण्यात आली आहे.त्यामुळे गांजेगाव सोइट शिवारात लवकरच ३३ के. व्ही सबस्टेशन उभारण्यात येईल असे संकेत दिसून येत आहे व तसी मंजुरी मिळालेली आहे. पत्राचे उत्तर मिळाले असून तपासणी करून कार्यवाही करावी असा शेरा आला आहे. व त्यामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळेल अशी मापक अपेक्षा आहे. गांजेगाव व सोईट शिवारातील शेतकऱ्यांनी आमदार साहेब , भाजपा जिल्हा अध्यक्ष यवतमाळ नितीनजी भुतडा व सिंहझेप वृत्तपत्राचे आभार व्यक्त करीत आहेत. निवेदन देतेवेळी बळवंतराव नाईक, वसंत फुल्लकोंडवार ,नितीन येरावार, संभाजी शिरडकर, संजय दिवशे, सुभाष टेकाळे, दिगंबर नाईक शिवप्रसाद वंजारे ,प्रभाकर पांडे ,अशोक नरमवाड, विश्वनाथ पंडागळे ,शिवहार पळसकर ,फकीरराव नाईक ई.शेतकरी उपस्थित होते.
