
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी : रामभाऊ भोयर
भारतीय राज्य घटनेनुसार कलम नंबर 171 नुसार विधानपरिषदेत 12 आमदार राज्यपालाच्या अधिकारातून विविध क्षेत्रातून शिफारशीवरून नियुक्त केले जातात. महाराष्ट्र विधानपरिषदेची रचना विधानसभेपेक्षा एक वेगळी आहे.हे सभागृह दर पाच वर्षांनी विसर्जित होत नाही.विधानपरिषदेचा आमदार कार्यकाळ सहा वर्षाचा असतो.एकूण 78 आमदारापैकी 30 आमदार विधानसभेतील आमदारांकडून निवडले जातात. तर 22 आमदार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींकडून निवडले जातात.तर शिक्षकांकडून 7आमदार तर 7आमदार पदवीधरमधून निवडले जातात तर 12 आमदारांची नियुक्ती राज्यपाल साहित्य,कला सहकार आणि सामाजिक सेवा क्षेत्रातून नियुक्त करतात.याच राज्यपाल कोट्यातील 5 जागा रिक्त असून पैकी 7 जागा महाराष्ट्रात राज्यपालांनी आक्टोंबर 2024 मध्ये भरल्या, यामध्ये चित्रा वाघ विक्रांत पाटील धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज पंकज भुजबळ इंद्रीस नायकवाडी हेमंत पाटील आणि मनिषा कायंदे यांना राजकीय पुढाऱ्यांच्या शिफारशीनुसार राज्यपाल द्वारे नियुक्त करण्यात आले आहे. मात्र यात दिव्यांग समाजसेवक, पत्रकार या क्षेत्रातील लोककल्याण करणारा एकही प्रतिनिधी नाही काय असा उ उपस्थित होत असून करीता या राज्यपाल कोट्यातील 5 जागा रिक्त असून यात दिव्यांग पत्रकार समाजसेवक उत्कृष्ठ समाजसेवकाची समाजकल्याण अधिकारी, जिल्हा अधिकारी यांच्या टीमद्धारे तालुका निहाय सर्वे करून यादी निरूप उत्कृष्ट कर्तव्यनिष्ठ दिव्यांग पत्रकार समाजसेवक क्षेत्रातील सेवकांना राज्यपाल अधिकारांतर्गत विधानपरिषद सदस्य म्हणून नियुक्त करावे अशाप्रकारचे निवेदन समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार संस्थापक अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटना यांनी हे निवेदन ई-मेल द्वारे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना पाठविले असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
