
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कळंब : तालुक्यातील पोटगव्हाण येथील एका बकरीचा वीज प्रवाहामुळे मृत्यू झाल्याची घटना कळंब तालुक्यातील पोटगव्हाण येथे शनीवार दिनांक ०६डिसेंबर रोजी सकाळी ९. ०० दरम्यान उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार पोटगव्हाण येथील रामाजी लक्ष्मण किनाके शनिवारी चौकातील डीपीच्या अर्थिग ताराचा स्पर्श झाल्याने बकरी दगावल्याची घटना घडली. रामदास लक्ष्मण किन्नाके यांच्या मालकीची ही बकरी होती.
रामदास किन्नाके यांचा मुलगा चेतन बकरी चरायला नेत होता. यावेळी बकरी अर्थिगजवळ गेली असता तिचा करंट लागून मृत्यू झाला. सुदैवाने चेतन बचावला. पोटगव्हाण येथील ट्रान्सफॉर्मर कमी पॉवरचे असल्याने अर्थिंगची देखभाल वारंवार करावी लागते. अर्थिगला करंट असल्याने गावकऱ्यांनी वीज वितरण विभागाला निवेदन दिले. डीपी बदलविण्याची मागणीही केली. मात्र, याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने बकरी दगावल्याचा आरोप होत आहे
