उन्हाळी प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून मिळत आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव !,ह्युमना पिपल टू पीपल इंडिया चा उपक्रम

जिल्हा प्रतिनिधी:प्रवीण जोशी ,यवतमाळ


ह्यूमन पीपल टू पीपल इंडिया अंतर्गत उमरखेड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या 40 शाळांमध्ये सुरू असणाऱ्या कदम उपक्रमाच्या माध्यमातून कदम उपक्रमाचे तालुका संयोजक राहुल मोहितवार यांच्या माध्यमातून यवतमाळ जिल्हा परियोजना अधिकारी कमल किशोर यांच्या मार्गदर्शनात उन्हाळी सुट्ट्यांमध्ये सर्व शाळांमध्ये उन्हाळी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उन्हाळी प्रशिक्षणा वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी अंगिकृत केलेल्या कलाकुणांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षणा बरोबरच गायन स्पर्धा, डान्स स्पर्धा, टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू तयार करणे, पर्यावरण संरक्षणाचे धडे व पाणी आडवा पाणी जिरवा ,स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे यांसारखे अनेक विविध प्रकारचे उपक्रम या प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून राबविले जाते.
या प्रशिक्षण वर्गात उत्कृष्ट कलाकृती सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षीस म्हणून शालेय साहित्याचे देण्यात येते. या उपक्रमाची सुरुवात धनज येथील जिल्हा परिषद शाळेमधून करण्यात आली यावेळी सदर शाळेचे मुख्याध्यापक कांबळे सर,व ईतर सह शिक्षक, विद्यार्थी हजर होते.


एक विद्यार्थी एक वृक्ष लागवडीची संकल्पना -कमल किशोर
पंचायत समिती उमरखेड अंतर्गत येणाऱ्या 40 शाळांमध्ये सुरू असणाऱ्या कदम उपक्रमाच्या माध्यमातून येणाऱ्या पावसाळ्या च्या आधी एक विद्यार्थी एक वृक्ष ही संकल्पना राबवण्यात ऐनार असून या संकल्पनेच्या माध्यमातून सुमारे अडीच हजार वृक्षांची लागवड केली जाणार असून त्याचे संगोपन पण सुद्धा केले जाणार आहे. असे यवतमाळ जिल्हा परियोजना अधिकारी कमल किशोर यांनी सांगितले
.


प्रत्येक शाळेत होणार किचन गार्डनची निर्मिती-मोहितवार
कदम उपक्रमाच्या माध्यमातून जवळपास 40 शाळांमध्ये किचन गार्डनची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दररोज लागणाऱ्या पोषण आहारातील पाले भाज्या या शाळेतच पिकवून विद्यार्थ्यांच्या पोषण आहारामध्ये उपयोगी घेतल्या जाणार आहे .ज्यामुळे विद्यार्थ्यांना पौष्टिक व सेंद्रिय खताचा वापर करण्यात येणाऱ्या पालेभाज्या मिळती. असे मत कदम तालुका सेवेत राहुल मोहितवार यांनी व्यक्त केले.