विद्युत प्रवाहाची तारेचा करंट लागून बैलाचा मृत्यू

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील प्रविण ज्ञानेश्वर धुपे हे शेतामध्ये बैल बंडी घेऊन जात असताना रस्त्यामध्ये जिवंत तारा पडलेल्या होत्या त्या जिवंत तारा मुळे एका बैलाला करंट लागून बैलाचा जागीच मृत्यू झाला, तर यामध्ये दोन मजुराचा जीव वाचला भरत मडावी सागर मेश्राम असे या दोन मजुराचे नाव असून महावितरण कंपनीच्या गलस्त कारभारामुळे एका शेतकऱ्याच्या बैलाचा जीव गेला या शेतकऱ्याला योग्य न्याय देण्यात यावा व त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करून त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी चर्चा सध्या गावातील लोकांकडून होताना दिसून येत आहे, संबंधित कर्मचाऱ्याला वारंवार सूचना केल्यास सुद्धा उचलण्यात आल्या नाही ही वस्तुस्थिती असल्याचे जनतेकडून बोलल्या जात आहे.