
सहसंपादक : रामभाऊ भोयर
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत व्यसनमुक्ती वर कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेने ६७ वर्ष पूर्ण करून महाराष्ट्रातील ३६ जिल्हा संघटकाचे संवाद, समन्वय आणि वार्षिक नियोजन बैठकीचे आयोजन शुक्रवार १३ जून ते १५ जून पर्यंत प्रयास, सेवाकुंर भवन दस्तुरनगर रोड, विमलनगर, फरशी फाटा, तालुका जिल्हा अमरावती याठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या ठिकाणी संघटकाना २०२५-२६ ची मान्यता तसेच वर्षभरात संघटकाचे कार्याचे नियोजन करण्यात आले. संघटकांना साहित्यात पोस्टर, प्रत्रक, महामानवाने विचारांचे पुस्तक, व्यसनमुक्ती वरील सापशिडी देण्यात आली. यावेळी संघटक बैठकीचे उद्घाटन प्रयास संस्था चे अध्यक्ष डॉ. अविनाश सावजी, नशाबंदी मंडळाचे सरचिटणीस वर्षा विद्या विलास, मुख्य संघटक चिटणीस अमोल मडामे, चिटणीस चंद्रकांत चौधरी, सदस्य बॉस्को डिसुझा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ३६ जिल्ह्यातील संघटक, ७ विभाग प्रमुख, नशाबंदी मंडळाचे कार्यालय कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रत्येक जिल्ह्यात किमान 10 शाळा तंबाखूमुक्त करण्याचा व प्रत्येक जिल्ह्यात ड्रग्स फ्री जिल्हा अभियान राबविण्याचा संकल्प करण्यात आला. अशी माहिती नशाबंदी मंडळाचे अमरावती विभाग प्रमुख व यवतमाळ जिल्हा संघटक ॲड. रोशनी वानोडे( सौ कामडी) यांनी दिली आहे.
