
सहसंपादक: रामभाऊ भोयर
आज दिनांक २७ एप्रिल रोजी अंगणवाडी केन्द्रं गोपालनगर तालुका राळेगाव येथे अंगणवाडी सेविका सरला आडे तसेच ग्रामपंचायतच सचिव शंकर मुजमुले, पर्यवेक्षिका स्नेहा अनपट, यांनी बालविवाह होत असल्याबाबत सागर विठाळकर बालविकास प्रकल्प अधिकारी राळेगाव यांना माहिती दिली, ताबडतोब ही माहिती मा. अमित भोईटे सर तहसीलदार राळेगाव , गटविकास अधिकारी मा. केशव पवार सर यांना देण्यात आली. तसेच मा. विशाल जाधव सर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा उपमुख्य कार्यक्रम अधिकारी यवतमाळ यांना माहिती दिली त्यांनी ताबडतोब अविनाश पिसुरडे सरंक्षण अधिकारी संस्थात्मक यांना टिमसोबत गोपालनगर पारधी बेडा येथे पाठविले,सपुर्ण टिम गावामध्ये दाखल झाली. सर्वांना याबाबतीत मार्गदर्शन करुन नोटीस बजावण्यात आली.
यावेळी तलाठी रुपेश चचाने,सरपंच किसनाजी झाडे, उपसरपंच प्रतिभा फुलमाळी,गणेश आत्राम चाईल्ड लाईन सुपरवायझर, गोपाल जाचकर पोलीस विभाग,आशा विभा मंगाम, कोतवाल मंजुषा सलाम यांची उपस्थिती होती.
याबाबतीत अमित भोईटे सर यांनी माहिती मिळताच तलाठी तसेच पोलीस विभागाशी सम्पर्क साधला तसेच सकाळीच गटविकास अधिकारी केशव पवार सर यांनी ताबडतोब माहिती मिळताच स्थानिक उपसरपंच यांच्याशी सकारात्मक चर्चा केली.व प्रशासनाची टिम येईपर्यंत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडु देऊ नये असे सांगितले.
मुला मुलीचे आई वडील यांची प्रशासनाने तसेच गावातील नागरिकांनी समजूत घातली, बालविवाहाचे दुष्परिणाम समजाऊन सांगितले त्यामुळे आई वडील यांनी स्वखुशीने विवाह न करण्याबाबत निर्णय घेतला.त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व नागरिकांनी देखील बालविवाहा सारख्या चुकीच्या प्रथेपासून दूर रहावे असे आवाहन यावेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
स्थानिक प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बाल विवाह रोखण्यात आला. अंगणवाडी सेविका सरला आडे व ग्रामपंचायत सचिव शंकरराव मुजमुले साहेब खुप खुप अभिनंदन.
मा. जिल्हाधिकारी विकास मिना सर यांनी राळेगाव प्रशासनाचे व सपुर्ण टिमचे अभिनंदन केले.
