पारंपरिक शेतीला बगल देत रेशीम शेती करत साधली आर्थिक प्रगती

निसर्गाचा लहरीपणा, मुख्य पिकाला मिळणारा अल्पभाव, यामुळे शेतकरी शेतीपासून दूर जात असताना रेशीम शेतीतून साधली आर्थिक उन्नती

जिल्हा प्रतिनिधी:प्रवीण जोशी, यवतमाळ


निसर्गाची अवकृपा उत्पन्नात येणारी घट यामुळे शेती या व्यवसायाला नेहमीच ही बाब भेडसावत आहे. त्यामुळे अनेक तरुण शेती या व्यवसायाकडे कडे यायला तयार नाही.पण राजु येदलेवाड या शेतकऱ्याने रेशीम उद्योगातून आपली प्रगती साधली
तसेच शासकीय अनुदानाचा सुद्धा लाभ झाला असून काही मोजके शेतकरी ही शेती करत होते त्यामुळे उत्पादित माल इतर प्रांतात न्यावा लागायचा रामनगर बेंगलोर या ठिकाणी या मालाला विक्रीसाठी न्यावं लागायचे कारण काही मोजकेच शेतकरी ही शेती करीत होते पण आता महाराष्ट्रात सुद्धा बाजारपेठा उपलब्ध होत आहे आणि इतर प्रांतात गेल्यानंतर अनेक अडचणींना सामोरे जावे लागायचे.

राजू यांनी पंधरा वर्षे इतर ठिकाणी मिळेल ते काम केली त्यातूनच त्याला ४ ते ५ हजार मोबदला मिळत होता. कामाचा वेळ अधिक श्रमाच्या प्रमाणात दाम मिळत नव्हता एके दिवशी सहजपणे मित्राच्या शेतात राजु गेल्यानंतर तेथील मित्राबरोबर रेशीम उद्योग या बाबीशी निगडित चर्चा झाली आणि नंतर लगेच आपण सुद्धा यात काही करू शकतो हे राजूला कळल्यानंतर त्यांनी आपली संकल्पना पत्नी सौ सावित्री हीस बोलून दाखवली व त्यांच्या पत्नीने राजूला उत्कृष्ट व स्तुत्य कामास मदत करायचे ठरविले आणि इथूनच राजू येदलेवाड च्या आयुष्यात एक नवे पर्व सुरू झाले व वेगळी कलाटणी मिळाली.
राजू यदलेवाड कडे केवळ दोनच एकर शेती असताना दोन मुली एक मुलगा एकूण पाच जणांचा उदरनिर्वाहाचे साधन म्हणजेच केवळ दोन एकर जमीन आणि मिळेल ते काम करून दैनंदिन गुजरान होत असत पण राजुनी आयुष्यात हार मानली नाही व त्यांनी आपला मोर्चा रेशीम उद्योगाकडे वळविला आणि आपल्या वडिलोपार्जित शेतामध्ये रेशीम उद्योग करण्याचे ठरविले त्यानुसार साल २०१४ मध्ये सुरुवात केली त्यानुसार शेडच्या बांधणीला सुरुवात झाली व उद्योग अर्थातच रेशीम शेती करायची त्यानुसार २०/५० चा शेड करून त्यामध्ये रेशीम कीटकासाठी दोन रॅक बनवल्या ५/४० फूट लांबीचे आणि सुरुवातीला रेशीम उद्योगाला ज्या बाबी लागतात अर्थातच चंद्रिका तुतीचे झाड इत्यादी लागणारे साहित्य भांडवल स्वरूपात जमा करून उत्पन्न घेण्यास २०१५ सुरुवात केली पण अनुभवाची कमतरता काही बाबी ची माहिती नसल्यामुळे त्यात पहिल्यांदा अपयश आले त्याने राजू खचून गेला होता पण एका यशस्वी पुरुषामागे एका कर्तबगार स्त्री चा हात असतो ही जुनी मण खोटी नाही राजूच्या पत्नी ने धीर दिला व पुन्हा उत्पन्न घेण्यास सुरुवात केली बघता बघता राजू येदलेवाड यांना या व्यवसाया संदर्भात पुरेपूर अनुभव व माहिती झाली आपोआपच अनुभवाच्या जोरावर उत्पन्नात प्रचंड वाढ होऊन इतरांकडे काम करून वर्षाकाठी काही हजार रुपये मिळत असताना या उद्योगातून राजू एक वेळच्या हंगामात एका लाखाच्या वरचे उत्पन्न काढत आहे. वर्षात असे पाच हंगाम निघतात त्यानुसार राजु वर्षाखाली पाच लाख रुपये कमवितो आहे आणि त्याच्या या वर्षाकाठी अवघ्या दोन एकर जमीन असलेल्या मुरमाड व अपरिपक्व जमिनीत तुतीची लागवड करून लाखो रुपये कमवावीत असल्यामुळे अनेक शेतकरी राजू कडे बघून या कठीण व नाजुक अशा व्यवसायाकडे बरेच शेतकरी यात उतरले असून राजू वेळातील वेळ काढून इतर शेतकऱ्यांना सुद्धा मार्गदर्शन करत आहे त्याच्या या कर्तृत्वामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने २०१८ ला पुरस्कार देऊन गौरव सुद्धा केला हीच त्याच्या कामाची पावती म्हणावी लागेल.