
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील सावरखेड येथील स्व. डॉ.नामदेवराव नंदुरकर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात ॔ काफी मुक्त परीक्षा एक संकल्प ॓ या उपक्रमांद्वारे आपल्याशी थेट संवाद साधण्यासाठी लोकप्रिय कलाकार श्री अजय मोहिते पुष्पा 2 फेम हे आपली कला सादर करण्यासाठी सावरखेडा नगरीत रविवार दिनांक 25/1/2026 रोज रविवारला येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. श्री सुभाष नंदुरकर अध्यक्ष मोहदा शिक्षणसंस्था कार्यक्रमाचे उपाध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष श्री नरेंद्र नंदुरकर उद्घाटक म्हणून पोलिस स्टेशन वडकीचे ठाणेदार सुखदेवराव भोरखेडे प्रमुख पाहुणे म्हणून सावरखेडा ग्राम पंचायतचे विद्यमान सरपंच श्री राजूभाऊ मेश्राम संस्थेचे कोषाध्यक्ष श्री प्रमोद नंदुरकर संस्थेचे सचिव श्री सचिन नंदुरकर संचालिका सौ.एकताताई नंदुरकर उपसरपंच श्री कपिल चौधरी तर निमंत्रित पाहुणे म्हणून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री श्रावणसिंग वडते सर वैराग्यमुर्ती प्रतिनिधी श्री रामुजी भोयर हे उपस्थित राहणार असून हा कार्यक्रम दिनांक 25/1/2026 रोज रविवारला सायंकाळी सहा वाजता सुरू होणार असून या कार्यक्रमाचे स्थळ स्व. डॉ.श्री नामदेवराव नंदुरकर प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सावरखेड ता.राळेगाव जिल्हा यवतमाळ येथे असून ही आदिवासी आश्रमशाळा डोंगराळ भागात असून सुद्धा या शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे खेळाचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे उपक्रम राबवत असल्याचे प्राचार्य श्री डंभारे सर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
