
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसापासून मंदिरातील तसेच लहान मोठ्या दुकानात छोट्या खाण्या चोऱ्याचे प्रमाण वाढलेले आहे, त्यामध्ये आज रोजी राळेगाव येथील पोलीस स्टेशनचा स्टॉप रात्रीला पोलीस गस्तीवर असताना फिर्यादी श्री योगेश रामदासजी ससाने व 29 वर्षे राहणार बहाले ले आऊट, चव्हाण पेट्रोल पंप जवळ प्रभाग क्रमांक 7 राळेगाव येथील घरातील सदस्य झोपून असताना दिनांक 8 /09/ 2022 रोजी रात्री सुमारे दोन वाजताच्या दरम्यान त्यांना घराच्या मागील दरवाजाच्या कडीकुंडा वाजल्याचा आवाज आल्याने त्यांनी त्यांच्या घरामागचा दरवाजा खोलला असता त्यांना पाहून तीन अज्ञात चोरटे पळून गेल्याने त्यांनी पोलीस स्टेशन राळेगाव येथे फोन करून माहिती दिल्ली तेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचून तीन अज्ञात चोरट्यांचा शोध घेत असताना तेथील चोरटे हे फिर्यादी यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या झाडाझुडपामध्ये लपून छपून बसले होते, पोलिसांना झाडे हलविण्याचा आवाज आल्याने पोलिसांनी त्यातील चोरट्यांना मोठ्या शिताफिने पाठलाग करून ताब्यात घेतले, त्यांचे नाव नामे क्रमांक 1 शाहरुख शेख उस्मान वय 30 वर्षे, राहणार अशोक नगर यवतमाळ क्रमांक 2 शेख सलमान वय 27 वर्षे राहणार कळम चौक कब्रस्तान जवळ यवतमाळ, क्रमांक 3 शहजाद शहा इस्त्राईल शहा वय 21 वर्षे, राहणार अशोक नगर यवतमाळ त्यांचे जवळून घरफोडी करण्याचे साहित्य दोन लोखंडी रॉड मिळून आले, चोरटे हे श्री योगेश रामदासजी ससाने यांचे घर हे दोन तीन दिवसापासून बंद असल्याने त्यांच्या घरी चोरी करण्याच्या प्रयत्नात होते, पोलिसांनी चोरांच्या ताब्यात घेऊन श्री योगेश रामदासजी ससाने यांच्या तक्रारीवरून भा. द. वी. कलम 379, 511, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे सदरची कारवाई राळेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय चौबे, राळेगाव पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील, पोलीस अमलदार गोपाल वा, मैदकर, सुरज चिव्हणे, प्रकाश मुंडे, होमगार्ड गजानन मुंडे गणेश महाजन व मनोज कुमरे यांनी केली.
