
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव येथील श्रीराम सिटी विश्वकर्मा देवस्थान येथे श्री प्रभु विश्वकर्मा जयंती उत्सव समिती तालुका राळेगाव चे वतीने दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी जयंती उत्सहात साजरी करण्यात आली.
सकाळी प्रतिमा पुजन कलश स्थापना व पंचारती ने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. जयंती उत्सव कार्यक्रमाचे उदघाट्न विनय मुनोत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष नंदुभाऊ राऊत, प्रमुख अतिथी डॉ. कुणाल भोयर, आकाश राऊत, शशिकांत धुमाळ, अशोक ठमके, प्रफुल धुर्वे, डॉ. विवेक तेलंगकार, संजय ठमके, फिरोज लाखाणी, कुंडलिक बांगडकर, रवि बावणे, किशोर सोनटक्के, सागर खंडाळकर, डॉ. आकाश खंडाळकर, उपस्थित होते.
यावेळी महिला मंडळींचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यामध्ये सौ. विद्याताई अवतारे, सौ. इंदुताई खंडाळकर डॉ. प्रविणा खंडाळकर, सौ. रुपाली कोसुळकर, सौ. प्रगती बावणे, सौ. संजीवनी चुनारकर, सौ. वैष्णवी अवतारे, सौ. सुमित्रा केळवतकर, सौ. मनिषा अवतारे सौ. निता मिसेकर, सौ. वैष्णवी बावणे, सौ. रेखा ठमके, प्रिया धुर्वे, सौ. सुरेखा क्षीरसागर, श्वेता खंडाळकर, निताताई बावणे सह महिला भगिनींनी सहभाग घेतला.
जयंती उत्सव यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष नरेंद्र अवतारे, गुलाबराव खंडाळकर, सचिन कोसुळकर, सुरज बावणे, मिथुन अवतारे, वासुदेव केळवतकर, बाबाराव मेसेकर, गजानन चुनारकर, शालिकराव सोनटक्के, संदीप येपारी, धनराज कोसुळकर, अरुण सावरकर, सुरेश वाघमारे, नंदु खंडाळकर, मंगेश कोळमकर, रोशन अवतारे, नरेश बावणे, शिवा खंडाळकर, गजानन अवतारे, सागर शेंडे, कार्तिक केळवतकर, रोहित खंडाळकर, सहयोग आगरकर, प्रफुल पाडवार, हरिदास आगरकर, रोहित आगरकर, अमर केळवतकर, विजय शेराम, प्रविण खंडाळकर, विशाल सावरकर, रवि अवतारे सह अनेकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा शेवट महाप्रसाद कार्यक्रमाने झाला.
