
राज्यशासना मध्ये विलगीकरण या मागणीसह अन्य मागण्यासाठी एसटी कर्मचारी राज्यभर मागील काही दिवसांपासून संप सुरू आहे. पण हा संप फोडण्यासाठी एसटी कामगार संघटनेला फुस लावून संप फोडण्याचा प्रयत्न वरील पातळीवरून होत असल्याचा आरोप ,पांढरकवडा आगारातील कर्मचारी यांनी केला आहे.
पांढरकवडा आगारातील ३७५ कर्मचारी कार्यरत असून संपामुळे आजपर्यंत १२ कर्मचाऱ्याची सेवसमाप्ती,३५ कर्मचाऱ्यांचे निलंबन, ६ कर्मचाऱ्यांची बदली व ५ कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्यात आले आहे.
कामगार संघटनेची मान्यता टिकवून ठेवण्यासाठी वरुन पैसे पाठवून संप फोडण्याचा प्रयत्न करीत आहे पण ठराविक दोन- चार कर्मचारी वगळता आंदोलन दुखवठा मधील कुणीही कर्मचारी कामावर नाही, पांढरकवडा आगारातील एकून ३७५ कर्मचाऱ्यापैकी प्रत्यक्ष कर्तव्यावर चालक , वाहक १० व अधिकारी ३० ,२ यांत्रिक आहे. व बाकी कर्मचारी हे संपावर ठाम असल्याची माहिती पांढरकवडा आगारातील कर्मचारी जुमनाके यांनी दिली.
