
दरवर्षी प्रमाणे ह्या ही वर्ष सोनगांव मारुती मंदिरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर याची 230 व्या पुण्यतिथी निमीत्त विनम्र अभिवादन करण्यात आले,सर्वप्रथम मातोश्री च्या प्रतिमेस सोनगांव ग्रामपंचायत चे नवनिर्वाचीत संरपच श्री सुभाष भाउ कारे यानी पुप्ष हार अर्पण केले.प्रतिमेचे पुजन श्री वसंत भाउ कारे पिपळगांव कुषि उपन्न बाजार समितीचे संचालक श्री विजय अण्णा कारे,श्री रामदास भाउ कारे, यानी केले तर श्रीफळ अर्पण श्री भगवान गाडे यानी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर धनगर समाज्याचे नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री भाउसाहेब ओहळ यानी माहिती देताना महापुरुषानी आपले पुर्ण आयुष्य मानव जात आणि मानवजातीच्या आणि निसर्ग समतोलनासाठी खर्च करुन एक आदर्श उभा केला,परंतु आपण माञ महापुरुषांना जातीच्या बंधनात अडकुन त्याना मर्यादित केले ही खरी दुःखाची बाब असुन त्याचा विचाराचा प्रचार आणि प्रसार करूनच खर्याअर्थाने त्याची जयंती पुण्यतिथी साजरी केली असे म्हणता येईल.ह्या वेळी सोनगांव ग्रामपंचायत चे माजी संरपच श्री दिपक दादा कारे ,सोनगाव वि विविध कार्य कारी सोसायटीचे संचालक श्री अशोक चिखले,नितीन गावले, नचिकेता पंतसंस़्था चे चेअरमन श्री अनिल दजगुडे जेष्ट नागरिक गगांधर भादेकर,वामन पवार,गोपाळ गाडे,वसंत गोडे, देविदास आडभाई,संजय बुचूडे, माधव गावले,ज्ञानेश्वर पाबळे,काताराम बुचूडे,साताराम बुचूडे,गोकुळ बुचूडे संतोष भादेकर,निखील भादेकर, आदिसह समाजबाधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता आरती व प्रसादानी करण्यात आली.
