जि.प.उ.प्रा. शाळा,वनोजा केन्द्र : धानोरा ता.राळेगाव या शाळेत हिंदवी स्वराज्याचा उत्सव साजरा

 राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर 

19 फेब्रूवारी 2023 ला उ.प्रा. शाळा वनोजा येथे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष श्री मोरेश्वर वटाणे व प्रमुख पाहुणे श्री वसंतराव उईके तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री मारोती सोनटक्के यांनी करून प्रतिमेला हार अर्पन करण्यात सर्वच नतमस्तक झाले—नतमस्तक आम्ही शिवरायाच्या चरणी ज्यांनी महाराष्ट्र वाचविला ज्यांनी लिहिली स्वराज्याची आणि पराक्रमाची गाथा त्या शिवरायांच्या चरणी ठेवितो माथा—
यानंतर सन्माननिय मंचावर उपस्थितांचे पूष्पगूच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यानंतर सावधान स्थितीत राज्यगीत सामूहीक म्हणण्यात आले.
त्यानंतर लिना बूरले ,उन्नती बूरघाटे व खूषी सावध या विद्यार्थ्यांनी गीतातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
त्यानंतर वर्ग 7वी ची विद्यार्थिनी खूषी सावध हिने शिवाजीच्या अफाट कार्याविषयी माहिती सांगितली .
त्यानंतर कर्तव्यदक्ष,विचारांची अफाट शक्ती असलेल्या मुख्याध्यापिका सौ.उईके मॅडम यांनी सर्वांचे शब्दसूमनांनी स्वागत करून प्रत्येक घरात शिवाजी असावा व जिजाऊ असावी असे संस्कारमय विचार मांडले.
अध्यक्षिय भाषणात विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांचा आत्मविश्वास वाढविला.

त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमूख पाहूणे आदरणिय श्री.वसंतरावजी ऊईके यांनी शाळेला दहा वृक्ष भेट देऊन शाळेत शिवजयंती निमित्ताने दहा वृक्षांची लागवड करण्यात आला.
त्यांचे शाळा व्यवस्थापन समितीने शाळेच्या व वनोजा गावाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन आभार मानले.
कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम राष्ट्रीय गीताने करून तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून करण्यात आला.