धारमोहा येथील पोलीस शिपाई नंदकिशोर जाधव यांच्यावर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार


प्रतिनीधी::प्रवीण जोशी
यवतमाळ


महागाव तालुक्यातील धारमोहा येथील पोलीस शिपाई नंदकिशोर धर्मा जाधव (वय ३८ वर्ष) यांचे कर्तव्यावर असताना आजारपणामुळे निधन झाले. नंदकिशोर धर्मा जाधव हे वर्धा येथे पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत होते. बुधवारी (ता.२०) रोजी त्यांच्या जन्मगावी धारमोहा येथे नंदकिशोर जाधव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी आमदार राजेंद्र नजरधने यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, पोलिस स्टेशन महागांव ठाणेदार सोमनाथ जाधव उपस्थित होते. मानवंदना देऊन पोलीस दलाच्यावतीने नंदकिशोर जाधव यांना शेवटचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी (ता.२०) रोजी असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत धारमोहा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.