बिटरगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदी पुसद येथील API प्रेम केदार साहेब ठाणेदार रुजू

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
7875525877


उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशनच्या वादग्रस्त ठाणेदार सुजाता बनसोड यांना वैद्यकीय रजेवर पाठविण्यात आले आहे त्यांच्या जागी API प्रेम केदार साहेब पुसद येथून यांनी बिटरगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदचा पदभार स्वीकारला आहे बिटरगाव ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे मोठया प्रमाणात वाढले होते त्यावर कोणाचेही नियंत्रण राहिले नसल्याच ढाणकी शहरात असूरक्षीतेचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे शहरातील सर्वपक्षीय नेत्यानी सुजाता बनसोड ठाणेदार यांच्या बदली साठी निवेदन देऊन बदलीची मागणी केली होती आणि हे बदलीचे प्रकरण चांगलेच गाजले होते शेवटी ठाणेदार सुजाता बनसोड यांना पोलीस प्रशासनाने वैधकीय रजेवर पाठविले आणि त्यांच्या जागी पुसद येथून API प्रेम केदार यांना ठाणेदार पदावर रुजू करण्यात आले आहे.