
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
चैत्र शुद्ध तृतिया दिवशी छेली खेडे पंजाब प्रांतात अनंत भक्तांचे गुरू ज्यांच्यावर लाखो भक्तांची श्रद्धा आहे. अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रेयाचे चौथे अवतार मानले जातात. जगाच्या कल्याण हेतूने कलियुगातील मूळ अवतार धारण केले. तेंव्हापासून चैत्र शुद्ध तृतीया श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दीन म्हणून साजरा केला जातो.
त्यामुळे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ दर्शनाला वेगळे महत्व आहे. ३१ मार्च २०२५ संकल्पपूर्ती श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ढाणकी मध्ये श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा केला गेला.
सकाळी भूपाळी आरती नंतर महाराजांचे सामूहिक अभिषेक सेवा व दहा वाजून तीस मिनिटांनी महाआरती व प्रसाद वाटप करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. तदनंतर श्री स्वामी चरित्र सारामृत सामूहिक पारायण घेण्यात आले. नाडीवरील विविध स्तोत्र मंत्र, प्रत्यक्षाचे महत्व केंद्र निरीक्षक पूनम चव्हाण यांनी भक्तांना सांगितले या सेवेचे यजमान म्हणून विवेक प्रतापवार, व विना प्रतापवार यांना.सेवेची संधी मिळाली..
शेकडो सेवेकर्यांनी हजेरीने सेवा केंद्रात उत्साहाचे वातावरण दिसून आले.
स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणजेच स्वामी समर्थ यांची जयंती महोत्सव साजरा केला गेला. स्वामी समर्थ प्रकट दिन हा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे. स्वामी समर्थ महाराज यांची शिकवण आणि त्यांचा आशिर्वाद सर्व भक्तांसाठी एक प्रेरणा ठरते. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.. हे त्यांचे वचन ऐकताच भक्तांना मानसिक शांती आणि आत्मविश्वास प्राप्त होतो.आज दिवसभर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ढानकी मध्ये शकडो सेवेकरी दर्शनाला येत होते.अशक्य ही शक्य करतील स्वामी या जयघोषाने वेगळेच भक्तिमय वातावरण बघायला मिळाला..श्री स्वामी समर्थ केंद्राची शिस्त ही नेहमीच प्रशंसा योग्य असते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्र निरीक्षक सौ पूनम चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली प्रतिनिधी योगिता चीन्नाववार, रेखा पंडितकर, निकिता रावते,माधवी हुडगे,अर्चना लकडे,शिवानी जाधव तसेच गजानन रावते, विक्की चव्हाण,प्रशांत पंडीतकर,पप्पू येरावार, विशाल धोपटे,मंगेश आगरमोरे, अभिजित कदम,यश कुबडे व समस्त भक्तांनी अहोरात्र मेहनत घेतली.
स्वामी प्रगट दिनी “हम गया नही जिंदा है” या अनुभूतीने गाजले श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सेवेकऱ्यांना अशक्यही शक्य झाल्याचे अनुभव येत होता.
