
सहसंपादक : रामभाऊ भोयर
डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंच राळेगावच्या वतीने २६ जानेवारी भारतीय संविधान अंमलबजावणी दिनानिमित्त आज दिं २ फेब्रुवारी २०२६ रोज सोमवारला आठवडी बाजार येथे सायंकाळी ५ ते १० या वेळात भीम बुद्ध गीतांच्या स्वरांजली पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या भीम भीम बुद्ध गीताच्या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध प्रबोधनकार गायिका अँड रागिनी प्रतापसिंह बोदडे झी टीव्ही सारेगमपा मुक्ताईनगर जळगाव यांचा बहारदार बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम पार पडणार आहे
या स्वरांजली पर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून शेअरअली बापू लालानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थान गुरुकुंज मोझरी यवतमाळ जिल्हा प्रचारक हे राहणार आहे.तर कार्यक्रमाला अध्यक्ष डॉ विठ्ठल लढे ,उपाध्यक्ष प्रवीण धुपे, प्रमोद काळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून रविभाऊ शेराम नगराध्यक्ष नगरपंचायत राळेगाव ,राकेश नक्षिने सर राळेगाव, गोपीचंद कांबळे इतिहासकार यवतमाळ, जीवन कोवे माजी सैनिक यवतमाळ, शामकांत येनोरकर माजी उपसभापती पंचायत समिती राळेगाव, संदीप पेंदोर राळेगाव, अंकुश मुनेश्वर वेडशी ,इम्रान पठाण राळेगाव, सुंदरदास कांबळे करंजी, डॉ. ओम प्रकाश फुलमाळी राळेगाव, अँड अल्पेश देशमुख नागपूर, नितेश दसोडे गुजरी( नागठाणा) जय रागिनवार वरध,भीमराव मानकर राळेगाव, आदी उपस्थित राहणार असून या भीम बुद्ध गीतांच्या स्वरांजली कार्यक्रमाला राळेगाव तालुक्यातील व परिसरातील जनतेने आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजक बाबा नगराळे सर मेजर इंद्रजीत लभाने यांच्या वतीने करण्यात आले आहे.
