स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न

भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अँड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना पालकमंत्री म्हटले की, भारत देश आज ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. आज भारताचे नाव जगात सुवर्ण पटलावर लिहिले आहे. कारण इथले थोर नेते, स्वातंत्र्य सैनिक, शेतकरी व कष्टकरी यांच्या मेहनतीचे हे फळ आहे.
यावेळी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती पालकमंत्रीनी दिली.
ओलीम्पिक स्पर्धेत यश मिळविणाऱ्या सर्व खेळाडूंचे त्यांनी जिल्हा प्रशासनाकडून अभिनंदन केले. तसेच आदिवासी जिल्ह्यातून सुद्धा असे खेळाडू तयार व्हावेत अशी कामना करून, त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी कोविड काळात रुग्णांची मनोभावे सेवा करणाऱ्या डॉक्टरांचा, विविध योजनांची उत्कृष्ट अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा व प्रधानमंत्री आवास योजनेत उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांचा सत्कार पालकमंत्री श्री पाडवी यांनी केला.
यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित, जि. प चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रघुनाथ गावडे , जिल्ह्याच्या खासदार डॉ. हिना गावित, जि. प अध्यक्ष सीमा वळवी, आमदार डॉ. विजयकुमार गावित, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी , स्वातंत्र्य सैनिक, इतर सर्व पदाधिकारी व शासकीय कर्मचारी उपस्थित होते.