बाभूळगावकरांनी अनुभवला शंकर पटाचा थरार—मध्यप्रदेशातील  चपट्या व डोंगरिया अव्वल


प्रतिनिधी यवतमाळ
प्रविण जोशी


  दि. 8, 9 व ,10 मार्च रोजी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज  शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र किसान काँग्रेस समितीचे जिल्हाध्यक्ष मनमोहन भोयर व मित्रपरिवार यांच्यावतीने आयोजित या शंकर पटाचे मानाचे पहिले बक्षीस मध्यप्रदेशातील बरिया येथील आर.एस.पटेल यांच्या चपट्या व डोंगरिया जोडीने 7.83 सेकंदात  अंतर पार करत अवल्ल येऊन पटकाविले. तर तालुका गटात प्रथम बक्षीस गजानन पांडे व ब गटातून प्रथम बक्षीस शिवानी विजय राठोड रा.दगडथर यांनी प्राप्त केले.        समारोपीयबक्षीस वितरणाच्याकार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके, प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री संजय देशमुख, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, संचालक मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रवीण देशमुख , ज्येष्ठ काँग्रेसनेते भैय्यासाहेब देशमुख, माजी सभापती जि. प.यवतमाळ भीमसिंग  सोळंके, जिल्हा काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष कृष्णा कडू, शिवसेना(ठाकरे) तालुकाध्यक्ष गजानन पांडे, पोलीस निरीक्षक  रवींद्र जेथे, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद अशोकराव घारफळकर, बंडू पाटील डफळे,  पांडूरंग लांडगे, नीतीन तिवारी, शैलेश गुल्हाने, आशिष सालणकर, मुन्ना पटेल यावेळी उपस्थित होते. शंकरपटामध्ये अ- सर्व्साधाधारण गट, ब  व तालुका गट असे गट ठेवण्यात आले होते. यात दोनलाख छेचाळीस हजाराचे जंगी बक्षीसे ठेवण्यात आली होती. प्रथम क्रमांकाचे  51 हजार रुपये पारितोषिक आर.एस.पटेल यांच्या जोडीने  पटकविले.  समीर पाटील घारफळ  यांच्या  बजरंग, बादशा जोडीने 7.83 सेकंदात बाजीमारून द्वितीय, अतिश वर्मा वाशिम यांच्या  गुरु, चेतक या जोडीने तृतीय क्रमांकाचे बक्षीस  पटकावले. या पटात मध्यप्रदेश, जळगाव ,वाशिम वर्धा,यवतमाळ जिल्ह्यातील  175 अशा विक्रमी बैल जोड्यानी भाग घेतला होता. ब गटात शिवानी विजय राठोड दगडथर सरपंच 7.83 सेकंद प्रथम,  अतिश वर्मा वाशिम 7.86 द्वितीय, कोमल नांदुरकरपुलगाव 7.89 सेकंद तृतीय, तर तालुका गटातून प्रथम गजानन पांडे विरखेड 8.77 सेकंद, द्वितीय शुभम रोम बाभुळगाव 8.80 सेकंद, तृतीय मुन्ना आमले सावंगी 8.88 सेकंद यांनी विजय मिळविला. विजेत्यांना क्रमानुसार ट्रॉफी व रोख रक्कमेचे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. पटाचे घड्याळ चरण खराते वजनार्धन मंडाळे यांनी हाताळले. त्यानंतर सायंकाळी शिवशाहीर सुरेश सूर्यवंशी व सहकारी पुणे यांचा छत्रपती शिवाजी महाराज रणगाथा शौर्याच्या हा  पोवाडा  कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी आजूबाजूतील खेड्यातील लोकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. शंकर पटाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष मनमोहन भोयर , डॉ. रमेशमहानुर, उपाध्यक्ष शेखर अर्जुने, संजय गावंडे, आशिष गुप्ता, सागर धवणे,अमोल कापसे,राजू पांडे, महेंद्र घुरडे,सिद्धेश्वर चौधरी, राजू चुके, प्रमोद कातरकर, अमेय घोडे,प्रवीण वाईकर, सतीश मेंढे, वीरेंद्र महानुर, सुनील येंडे, अजय तातड, हबीब बेग,अहमदखा पठाण, प्रज्ज्वल राऊत, सुरेश आखरे, मुनीफ शहा,  अविनाश गावंडे, प्रणाल वानखडे, मो. अश्फाक मो.शमी, मंगेश देरे, जितेंद्र राऊत, सागर गावंडे, उमाकांत राठोड, कृष्ण ठाकरे, विपुलबोदडे, अंकुश सोयाम, प्रदीप नांदुरकर, विजय देवूळकर, कवीश गावंडे, प्रथमेश गावंडे,अक्षय लोणकर, प्रदीप गावंडे, अक्षय राऊत, कल्पक वाईकर, अभिलाष शेळके आदींनीपरिश्रम घेतले.