
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील झाडगाव ग्राहक पंचायतची शाखा झाडगाव येथे स्थापन करण्यात आली. उमेश केवटे अध्यक्ष,राजू चनने उपाध्यक्ष, हरीदास कुबडे उपाध्यक्ष, रुपेश काले सचिव, मनोज देशपांडे कोषाध्यक्ष, उत्तम शेंडे सहसचिव, गणेश राठोड संघटक, सोनु भगत महिला प्रमुख, इतर सदस्य पुढील प्रमाणे – शरद केवटे, निलेश भोयर, रुपेश रेंगे, अरविंद चांदेकर, सुमित्रा राजूरकर, सविता विरुळकर.
ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष डॉ. के.एस. वर्मा व सचिव प्रा. मोहन देशमुख व संघटक विनय मुणोत यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात कार्यकारणीची स्थापना करण्यात आली. यावेळेस ग्राहक पंचायतीच्या कार्यप्रणालीत माहिती नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना देण्यात आली.
