
सहसंपादक : रामभाऊ भोयर
ग्राम स्वराज्य महामंच,राष्ट्रीय संघटण , हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात, महत्त्वपूर्ण विचारांची मांडणी करणारे संघटना आहे,जी मानसं तळागाळातील सामान्य लोकांसाठी सामाजिक आणि मानवतावादी विचारांची जबाबदारी स्विकारुण सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत यांच्या कार्याचा गौरव म्हणून ” ग्राम स्वराज्य महामंच ” अशा लपलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींला उजेडात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. – ग्राम स्वराज्य महामंच संस्थापक अध्यक्ष मा मधुसूदन कोवे गुरुजी प्रा मोहनजी वडतकर, गिरीधरजी ससनकर रेखाताई निमजे कृष्णा भोंगाडे आशाताई काळे आणि शेकडो सदस्य यांच्या माध्यमातून ही सामाजिक चळवळ अनेक वर्षांपासून चालवत आहे. या वर्षी च्या वर्षेपुर्ती कार्यक्रमात एक आठवण नवं वर्षाची तुकड्या ची झोपडी स्मरणिका स्पंदन प्रकाशन सोहळ्याच्या प्रमुख उपस्थिती मान्यवर म्हणून मा भावनाताई गवळी ( खासदार ) यवतमाळ -वाशीम लोकसभा यांच्या हस्ते स्मरणिका प्रकाशन आणि विशेष ” माणिक रत्न पुरस्कार ” सोहळा यवतमाळ येथे पार पडला आणि विशेष व्यक्तीमत्व म्हणून नागपूर, अमरावती वर्धा, चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ येथील ११ व्यक्तीला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले — यांत प्रामुख्याने कु अरुणा लोनकर कोलाम समाजातील युवा लेखिका राळेगाव तालुक्यातील (पिंपरी दुर्ग ) हिला ” माणिक रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले ग्राम स्वराज्य महामंच सर्व घटकांतील लोकांपर्यंत जावुन त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत महत्वाची भूमिका पार पाडत आहेत म्हणून सर्व स्तरावर कौतुक होत आहे या निमित्ताने विशेष मान्यवर मा वसंतराव पुरके माजी आमदार मा ॲड.वामनराव चटप साहेब माजी आमदार,मा प्रविण देशमुख माजी अध्यक्ष जिल्हा परिषद यवतमाळ मा बळवंतराव मडावी कार्याध्यक्ष प्रदेश कमेटी गोंडवाना गणतंत्र पार्टी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा मोहन वडतकर यांनी केले आयोजन कमेटी चे प्रमुख मा मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच मा गिरीधरजी ससनकर मा कृष्णा जी भोंगाडे आशाताई काळे रेखाताई निमजे यांनी सर्व पाहुण्यांचे आभार मानले
