
सहसंपादक : रामभाऊ भोयर
हिंगणघाट तालुक्यातील
वडनेर गावालगतून जाणारा राष्ट्रीय महामार्ग सध्या ग्रामस्थांसाठी अपघातांचा सापळा ठरत असल्याचे चित्र आहे. महामार्गावर आवश्यक वाहतूक सुरक्षेच्या सुविधा नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत असून, याचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर तसेच वैद्यकीय आपत्कालीन सेवांवर होत आहे.
या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वडनेर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते गुरुदयालसिंह जुनी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस तसेच वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. पंकज भोयर जी यांना निवेदन देण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, कोर्टाच्या निकाल लवकरात लवकर लागून सरीस रोड करण्यात यावा .
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आजनसरा–वडनेर चौक तसेच गावाच्या दोन्ही टोकांवर स्पीड ब्रेकर नसल्यामुळे भरधाव वाहतूक सुरू असून अनेक अपघात घडले आहेत. रंबल स्ट्रिप, रिफ्लेक्टरयुक्त कॅट आय, सोलर ब्लिंकर दिवे व स्पष्ट सूचना फलकांचा अभाव असल्याने वाहनचालकांना पूर्वसूचना मिळत नाही, परिणामी अपघातांचा धोका अधिक वाढतो.
राष्ट्रीय महामार्गामुळे वडनेर गाव दोन भागांत विभागले गेले असून एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध नाही. शालेय विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक व शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडावा लागत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी सुरक्षित क्रॉसिंग, खुले अंडरपास व ओपन ओव्हरब्रिजची तातडीने व्यवस्था करण्याची मागणी केली आहे
ग्रामीण रुग्णालय यांच्या जवळ कट देण्यात यावा रुग्णाला यांना लवकरच लवकर शिवा उपलब्ध होण्यासाठी हॉस्पिटलला लागून कट ची मागणी केली आहे,
तसेच वडनेर गावासाठी स्वतंत्र सर्व्हिस रोड उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना थेट महामार्गाचा वापर करावा लागत असून ही बाब अत्यंत धोकादायक आहे. महामार्गावर रात्रीच्या वेळेस सुरक्षित वाहतुकीसाठी पथदिवे (स्ट्रीट लाईट) नसल्याने रोडवर आंधळा राहतो हायवेचे मोठे गाव असून स्ट्रीट लाईट सुविधा उपलब्ध नाही सुरू करण्याचीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
सदर मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास भविष्यात गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले असून शासन व संबंधित विभागांनी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्वरित निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे निवेदन देताना खरेदी-विक्रीचे उपाध्यक्ष मा राजूभाऊ भोरे , संस्था अध्यक्ष मा कृष्णाजी महाजन साहेब, मा गणेश जयस्वाल , मा नारायणभाऊ कुंभारे , मा संजय लोकरे , मा आकाश अढाल, रायबहादुरसिंग , प्रशिक मुनेश्वर, सिद्धू , युवा मंडळी मोठ्या प्रमाणात निवेदन देण्यात गावकरी उपस्थित होते
