
सहसंपादक -रामभाऊ भोयर
राळेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदाच्या निवडणुकीसाठी ८० उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले होते अखेर दिं ५ मार्च २०२३ रोजी छाननीत ८० उमेदवारा पैकी ७५ उमेदवारांचे नामांकन वैध ठरले तर ५ उमेदवारांचे नामांकन अवैध ठरले आहे.
यामध्ये सहकारी संस्था मतदार संघात सर्वसाधारण २८ नामांकन वैध आहे तर महिला राखीव ७ नामांकन वैध आहे महिला राखीव मधून मंगला राजू ठाकरे यांच्या अवैध ठरला इतर मागासवर्गीय मधील २ नामांकन वैध आहे तर विजा भज ४ नामांकन वैध, विजा भज मधून निखिल राजेंद्र शेळके यांचे नामांकन अवैध ठरले
ग्रामपंचायत मतदार संघात सर्वसाधारण गटात ९ नामांकन वैध तर नंदकुमार हिरालाल गांधी व राजेंद्र वामनराव तेलंगे यांचे नामांकन अवैध ठरले
अनुसूचित जाती जमाती गटात ६ नामांकन वैध तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक ४ नामांकन वैध,तर आर्थिक दृष्ट्या घटक मधील चंद्रशेखर वामन उगेमुगे यांचे नामांकन अवैध ठरले व्यापारी अडते मतदार संघात ११ नामांकन तर हमाली मापारी व तोलारी मतदारसंघात ४ असे एकूण ७५ नामांकन वैद्य ठरले तर तर पाच नामांकन अवैद्य ठरले आहे.
