मन्याळी येथील माळावरच्या महादेवाला भर पावसात भाविकांची गर्दी

बिटरगांव ( बु )//प्रतिनिधी//शेख रमजा

बिटरगांव ( बु ) पासून ४ किलोमीटर अंतरावर पैनगंगा अभयारण्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या उंच टेकडीवर १२५ वर्षे प्राचीन असलेले महादेवाचे मंदिर आहे . मंदिरामध्ये जाण्या येण्यासाठी ४ कि .मी चिखलयुक्त रस्त्याने भाविकांना पैदल जात.पावसाच्या रोमहर्षक वातावरणात चार उंच डोगराच्या टेकड्या चढत उतरत पायी प्रवास करून न थकता भाविक मोठ्या श्रध्देने, उत्साहाने हर हर महादेवाच्या गर्जना करीत उंच टेकडीवर महादेवाच्या दर्शनासाठी पोहोचतात. पावसामुळे रस्ता खूप चिखलमय असुन पाय सुद्धा घसरतात एवढे असताना सुद्धा भविकभक्तांची दर्शनासाठी मोठी रीघ लागलेली होती . उमरखेड तालुक्यातील व परीसरातील अनेक गावातून भाविक भक्त श्रावण महिना आणि पोळा करी निमित्त दर्शनासाठी येथे येत असतात. विशेषतः जोराचा पाऊस असून सुद्धा भाविकांचा उत्साह थोडाही कमी झाला नाही.कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त चोखपणे तैनात करण्यात आला आहे.पोलीस बंदोबस्तमध्ये बीट जमादार विद्या मॅडम, होमगार्ड चंद्रमणी वाढवे , गजानन पेंधे हे आपले कर्तव्य बजावत होते .