महाविकास आघाडीच्या वतीने राळेगाव मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी सर्व स्तरातील लोकांचे सहकार्य

सहसंपादक : रामभाऊ भोयर

विधानसभा निवडणुका जशा जशा जवळ येऊ लागल्या तसा तसा प्रचाराला वेग येऊ लागला असून प्रत्येक उमेदवार आपापल्या पक्षाकडून आश्र्वासित करून मतं आपलीसी करून देण्यासाठी प्रयत्न करत असून सध्याचे वातावरण जर बघितले तर निश्चितच महाविकास आघाडी आणि युतीत खरी लढत असून दोन्ही उमेदवारांनी आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न करत असून सध्याचे वातावरण मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक वसंत पुरके सरांसाठी पोषक आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.कारण महायुतीच्या काळात जी शेतकरी शेतमजूर व सुशिक्षित बेरोजगारांची स्वप्ने भंग पावली.त्यात शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव नाही. दैनंदिन जीवनातील वस्तूवर जिएसटी लावली गेली.डिझेल पेट्रोल, गॅस यांचे दिवसेंदिवस वाढत असलेले भाव, दिवसेंदिवस वाढत चाललेली बेरोजगारी अशा एक ना अनेक प्रश्नांना मतदारसंघात प्राचार्य डॉ अशोक ऊईके यांना तोंड द्यावे लागत असून महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक वसंत पुरके सरांना मात्र यामुळे एकप्रकारे सहानुभूती प्राप्त होत असून गावागावात प्राध्यापक वसंत पुरके सरांना चांगला प्रतिसाद मिळत असून मनसेने सुद्धा उभे केलेले उमेदवार अशोक मेश्राम हे सुद्धा प्रचारात मागे नसून त्यांनी अगोदरच राळेगाव मतदारसंघ पिंजून काढला आहे त्याचसोबत वंचित आघाडीचे उमेदवार किरण कुमरे हे सुद्धा राळेगाव मतदारसंघात परिचित असून त्यांचा सुद्धा जनसंपर्क असल्याने ही निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशातच निश्चित कुणाला फटका बसणार हे मात्र सांगता येणार नसले तरी यांचा फायदा नक्कीच महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक वसंत पुरके सर यांना होणार असल्याने आजच पुरके सरांचा विजय पक्का असल्याचे बोलले जात असून या विजयाला महत्त्वाचे कारण म्हणजे सत्ताधाऱ्यांवर असलेला महागाई भाव यांचा रोष असल्याचे कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्या दरम्यान दिसून आल्याचे प्रतिनिधींनी म्हटले आहे.