
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ
महागाव येथिल विश्रांमगृह येथे शनिवारी (ता.२६) रोजी सकाळी अकराच्या दरम्यान आम आदमी पक्षाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पुढील निवडणुका संदर्भात नियोजन ठरले. आम आदमी पार्टी जिल्हा अध्यक्ष वसंतराव ढोके यांच्या अध्यक्षते खाली आम आदमी पार्टीचे जिल्हा संघटक विलास वाडी , संजय ढोले जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ, यांनी यावेळी पक्ष संघटन, गाव पातळीवर शाखा स्थापने संदर्भी मार्गदर्शन केले आहे. आम आदमी पक्ष व तालुका कार्यकारणी तालुक्यात देविदास धारावीकर, जगदीश महाराज चव्हाण (पिंपरीकर) जिल्हा कमिटी यवतमाळ, श्रीमती ममता राठोड महिला तालुका महागाव तालुका उपाध्यक्ष, शालिक जोगदंड,अविनाश चव्हाण, तसेच महागाव शहर कार्यकारणी मध्ये पदाधिकारी म्हणून विवेक राजेंद्र नरवाडे शहराध्यक्ष यांची निवड करण्यात आली. तर महागाव शहर आम आदमी पार्टी चे उपाध्यक्ष दीपक तुकाराम तायवाडे, उपाध्यक्ष सुशील संजय नरवाडे, उपाध्यक्ष सिद्धांत शरदचंद्र डोंगरे म्हणून यावेळी नियुक्ती करण्यात आली. यावेळी महागाव शहर कार्यकारणी मध्ये सहसचिव देवानंद श्रीराम कोपरकर, संघटन मंत्री म्हणून रुद्र विठ्ठल दळवे, युवा आघाडी आम आदमी पार्टी अध्यक्ष गणेश पाटे, तसेच आम आदमी पार्टी अनुजाची जमाती आघाडी अध्यक्ष इरशाद शेख, यांची निवड करण्यात आली. क्रीडा अध्यक्ष सतीश देवानंद सांगळे ,ओबीसी आघाडी अध्यक्ष ऋषिकेश विलास कोपरकर आणि याप्रसंगीइतर सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते. आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. महागाव तालुक्यातआगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका आम आदमी पार्टी लढणार अशा प्रकारचा याप्रसंगी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात निर्धार झाला.
