
सहसंपादक: रामभाऊ भोयर
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तिनशे एकसष्ट बी वरील पथदिवे मार्ग निघाल्याने येत्या पंधरा दिवसात सुरु होणार आहे
तहसील कार्यालयासमोरील स्ट्रीट लाईट अनेक महिन्यांपासून बंद होते परंतु त्यावर तोडगा काढण्यास नगरपंचायत समन्वय अभावी अपयशी ठरली होती.
आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी विद्युत विभाग व नगरपंचायत प्रशासनाची संयुक्त बैठक आयोजित करून थकित वीज बिल ६ लाख ९० हजार पैकी तीन लाख रुपये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लोक वर्गणीतून देण्याचे कबूल केल्यामुळे आता काही दिवसांत हे पथदिवे सुरू होईल यात शंका नाही.
राळेगाव मतदार संघातील शेतकऱ्यांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला पांदण रस्त्याचा प्रश्न येणाऱ्या काळात, मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ता योजनेच्या माध्यमातून सुटणार आहे.
मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजने बाबत मंत्री महोदय अशोकराव उईके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रशासकीय अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पुढील काळामध्ये राळेगाव तालुक्यातील व पूर्ण मतदार संघातील सर्व च्या सर्व बांधकाम रस्ते अतिक्रमण मुक्त करून त्याचे खडीकरण करण्याचे योजना आखण्यात आली आहे.
या पांदण रस्त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळेल याकरता सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे व डॉ. अशोकराव उईके यांचे खूप खूप आभार मानण्यात आले आहे
यावेळी या आढावा बैठकीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,कृषी अधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
