महाराष्ट्र स्टेट ओपन कराटे चॅम्पियनशीप २०२३ मध्ये वरोरा येथील विद्यार्थ्यांचे सुयश

७ मे २०२३ ला वर्धा येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र स्टेट ओपन कराटे चॕम्पियनशीप २०२३ या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या ५०० विद्यार्थ्यांमध्ये फौजी वाॕरीअर्स मार्शल आर्ट वरोरा या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी कराटे प्रशिक्षक रवी चरुरकर यांच्या मार्गदर्शनात वरोरा तालुक्याचे नाव उंचीवर नेलेले आहे . या स्पर्धेत सानिया आवारी , नंदिका भोयर , पिऊश विधाने व शंतनू धवने या स्पर्धकांनी गोल्ड मेडल पटकाविले तर निर्गुना पेंदोर हीने सिल्वर मेडल व तपस्या धवने आणि हर्षाली कपूर यांनी ब्रांझ मेडल पटकावित फौजी वाॕरीअर्स व वरो-याचे नाव मोठे केले आहे . या स्पर्धकांसोबत त्यांच्या कोच अश्विनी नरड यांचेही फार मोठे योगदान आहे .

वरो-यासारख्या एका लहान तालुका स्तरातून फौजी वाॕरीअर्स च्या विद्यार्थ्यांची ही गगनभरारी निश्चितच वरोरावासियांसाठी अभिमानास्पद आहे . या संस्थेचे मार्गदर्शक दिगांबर खापने , अध्यक्ष प्रविण चिमूरकर , सचिव रवी तुरानकर यांनाही या यशाचे श्रेय जाते . मागील वर्षीही याच संस्थेच्या विद्यार्थ्यांनी काठमांडू नेपाळ येथे संपन्न झालेल्या स्पर्धेतही दोन गोल्ड दोन सिल्व्हर व आठ ब्रांझ मेडल पटकावून वरो-याचे नाव मोठे केले होते . निश्चितच वरोरा येथिल फौजी वाॕरीअर्स कराटे या खेळातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार करण्यासाठी सज्ज झालेली आहे .