
दिनांक 23 डिसेंबर रोजी कळंब तालुक्यात आंधबोरी येथे स्पेक्ट्रम फाउंडेशन द्वारा व उत्तम कापूस निर्मिती प्रकल्पा अंतर्गत राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमा करिता प्रमुख पाहुणे म्हणून,स्पेक्ट्रम फाउंडेशन चे पियु व्यवस्थापक नरेश बाजरे, सरपंच श्रीमती अंजुताई राऊत व पोलीस पाटील ज्ञानेश्वर शेडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रक्षेत्र अधिकारी वैभव इजपाडे यांनी केले. त्यानंतर प्रास्ताविक पि यु व्यवस्थापक नरेश बाजरे यांनी केले ते म्हटले माती परीक्षण करून मातीच्या अहावला नुसार खत व्यवस्थापन केल्यामुळे रासायनिक खता मध्ये होणाऱ्या अतिरिक्त खर्चाची बचत शिवाय मातीचे आरोग्य जोपासता यावे यावर आपण भर द्यायला पाहिजे,शेतकरी खुशाल देवतळे यांनी मागच्या वर्षी वापरलेल्या बायोचार मुळे झालेला फायदा तो सर्वांच्या लक्षात आणून दिला आणि या वर्षी सर्वांनी करून पहावे व ती काळाची गरज या वर भर देऊन ज्या शेतात आपण कार्यक्रम ठेवला आहे म्हणजे एकात्मिक खत व्यवस्थापन डेमो प्लॉट चे वैशिष्ट,फावरणी करतांना व्ययक्तिक सुरक्षात्मक साधनाचा वापर इत्यादि बद्दल माहिती दिली व सर्व शेतकरी बंधू अणि भगिनींना राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमा मध्ये डेमो फार्मर श्री खुशाल देवतळे यांचा शाल श्रीफळ व झाड देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमा करिता स्पेक्ट्रम फाउंडेशन चे प्रक्षेत्र अधिकारी वैभवी वाकडे,संदीप जगताप,अंकुश न्हाने, गावाचे सरपंच,पोलीस पाटील व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
