
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक 18/1/2024 पासून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .18/1/2024 रोज गुरूवारला संस्थेचे माजी अध्यक्ष स्व. शशिशेखर कोल्हे यांचे पुण्यस्मरणाचा सोहळा संपन्न होणार आहे या कार्यक्रमांचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष दिलीप कोल्हे हे राहणार असून हा कार्यक्रम सकाळी ठीक 11.00 वाजता पार पडणार आहे.त्यानंतर ठिक 12.30 वाजता वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याला सुरुवात होणार या स्नेहसंमेलनात लखाजी महाराज विद्यालय झाडगाव आणि लखाजी महाराज इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे या कार्यक्रमांचे अध्यक्ष व उद्घघाटक सस्थेंचे अध्यक्ष दिलीप कोल्हे हेच असून दिनांक 19/1/2024 रोज शुक्रवारला सकाळी 11.00 वाजता तालुका स्तरावरील समूह नृत्य स्पर्धा होणार अआहे या कार्यक्रमांचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष आशिष कोल्हे हे असून उदघाटक रोशन कोल्हे हे राहणार आहे .प्रमुख उपस्थिती संस्थेचे संचालक चित्तरंजन कोल्हे,शेखर झाडे, दिलीप देशपांडे, सुरेश गंधेवार,भरत पाल, गुलाबराव महाजन,सरोजनीबाई कोल्हे, सरपंच रामदास किन्नाके, पोलिस पाटील प्रशांत वाणी, तंटामुक्त समिती अध्यक्ष वासुदेव तिजारे, जिल्हा परिषद शाळा समिती सभापती विजय गायधने , मुख्याध्यापक विलास निमरड हे उपस्थित राहणार असून सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता प्रथम पुरस्कार 7000 रूपये रोख व स्मृतिचिन्ह, द्वितीय पुरस्कार 5000 रूपये रोख व स्मृतिचिन्ह, तृतीय पुरस्कार 4000 रूपये रोख व स्मृतिचिन्ह ,चतुर्थ पुरस्कार 3000 रूपये रोख व स्मृतिचिन्ह आहे दिनांक 20/1/2024 रोज शनिवारला तालुका स्तरीय 17 वर्षांखालील मुला मुलींच्या कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून पुरस्कार मुलांकरिता प्रथम पारितोषिक 10000 रूपये रोख व स्मृतिचिन्ह, द्वितीय पारितोषिक 7000 रूपये रोख व स्मृतिचिन्ह तृतीय पारितोषिक 5000 रूपये रोख व स्मृतिचिन्ह असे राहणार असून मुलींकरिता सुद्धा प्रथम पुरस्कार 10000 रूपये व स्मृतिचिन्ह द्वितीय पुरस्कार 7000 रूपये रोख व स्मृतिचिन्ह तृतीय पुरस्कार 5000 रूपये रोख व स्मृतिचिन्ह अशाप्रकारे भव्य अशा बक्षिसाचे आयोजन करण्यात आले आहे याच कार्यक्रमात आमच्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचा भडीमार करून उत्साह वाढविणाऱ्या आश्रय दात्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येणार असून या स्पर्धेत तालुक्यातील शाळांनी सहभाग नोंदवून सहकार्य करण्याची विनंती संस्थेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक चित्तरंजन कोल्हे यांच्या कडून करण्यात येत असून पालकांनी सुद्धा या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
