
एल एम बी उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने दिनांक ४ ते ५ फेब्रुवारी रोजी या दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पंचायत समिती सभापती अशोक केवटे होते तर प्रमुख म्हणून पोलीस उपनिरीक्षक बोरकर राळेगाव तर उद्घाटक म्हणून रवी चांदेकर लोकमत जिल्हा प्रतिनिधी वर्धा हे होते प्रमुख पाहुणे म्हणून साईबाबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन भोयर तसेच संस्थेचे सचिव अविनाश भोयर ग्रामपंचायत सदस्य सचिन राडे ,शरद केवटे, गुड्ड मेहता ,हरी कुबडे, बाबु भोयर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष श्रावनसिंग वडते सर ,अरुण केवटे ,मंगलाताई भोयर पोलीस पाटील प्रशांत वाणी हे मान्यवर उपस्थित होते आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना शिक्षण शिस्त व संस्काराचे महत्त्व पटवून दिले शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य नाट्य व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करून उपस्थित प्रेक्षकांची मनी जिंकली विद्यार्थ्यांच्या कलागुणांना रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली या स्नेहसंमेलनाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजू भोयर यांनी केले तर सूत्रसंचालन निलेश मेंढे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वीतेकरीता शिवा जाधव ,दिनेश गेडाम, प्रतीक भोयर, निकिता वाडेकार, सानिका ठोंबरे, या सर्व सहाय्यक शिक्षकांनी मोलाचे योगदान दिले एकूणच हा कार्यक्रम शैक्षणिक व सांस्कृतिक दृष्टीने प्रेरणादायी ठरला,
