
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक 7आक्टोबर 2025रोजी जि प शाळा बोरीसिंह येथे केंद्र परिषद व टार्गेट पिक तथा महादीप कार्यशाळा व सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलासभाऊ देवकते, प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच शकूंतलाताई उमाटे, उपसरपंच अजयभाऊ धुरट, व सत्कारमुर्ती श्रीमती डॉ शिल्पाताई पोलपेल्लीवार उपशिक्षणाधिकारी प्राथमिक जि प यवतमाळ व विस्तार अधिकारी दिपीकाताई गुल्हाणे, अकोला बाजार केंद्राचे केंद्र प्रमुख पुंडलिक रेकलवार , तसेच सावरखेडा , (राळेगाव ) केंद्राचे केंद्रप्रमुख मुकेश भाऊ भोयर , शाळा व्य.समितीचे वर्षाताई इंगोले,श्रीकांतभाऊ ठाकरे, विलास ठाकरे, किशोर शेटे ,केंद्रप्रमुख शुभांगीताई वानखडे, मुख्याध्यापक राधेश्याम चेले,अंकुश भाऊ रेड्डे सुनिता हजारे व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.
पाहुण्याचे आगमन लेझीम पथकाच्या संचलनाने झाले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने मान्यवराचे स्वागत केले. प्रास्ताविक केंद्रप्रमुख पुंडलिक रेकलवार यांनी केले.कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रामध्ये टार्गेट पिक कार्यक्रमा विषयी शिक्षकांची कार्यशाळा संपन्न झाली.,महादीपबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सर्व उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात उपशिक्षणाधिकारी डॉ. शिल्पा पोलपेल्लीवार यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याच सोबत बदली होवून इतर ठिकाणी गेलेल्या शिक्षकांचा त्यांच्या शैक्षणिक योगदाना बद्दल सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. केंद्रामध्ये नविन रुजू झालेल्या सर्व शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी बोलताना उपशिक्षणाधिकारी यांनी खेड्या पाडयातील विद्यार्थी मोठया प्रमाणात शिष्यवृत्ती धारक व्हावे असा आशावाद व्यक्त केला. त्या करीता टारगेट पीक ॲप चा वापर करून अभ्यास करावा व आपल्या जिल्हयातून 5 वी 8 वी चे विद्यार्थी मोठया प्रमाणात शिष्यवृती परीक्षेत यश संपादन करतील असा आशावाद व्यक्त केला. सत्काराला उत्तर देताना पुष्पाताई महल्ले भोयर यानी अकोला बाजार केंद्रातील शाळा व शिक्षकांचे कार्य प्रेरणादायी आहे असे मत व्यक्त केले… त्यानंतर केंद्रप्रमुख मुकेशभोयर यांनी आपल्या काव्यातुन बोरी सिंह शाळा ते केंद्र समन्वयक पदा पर्यंतचा प्रवास सादर केला. शेवटी अध्यक्षीय भाषण अजयभाऊ धुरट यांनी केले.शालेय गुणवत्ता व शाळेच्या विकासावर प्रकाश टाकला.
. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सौ सुनिता हजारे , रंजना चांदेकर , शंकर माहुरे , चंद्रशेखर मात्रे , अमोल माळे सर., विवेक वाईकर, सुनिता काळे, संजय पातोडे, सुनिल काळे भाऊ. तसेच केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व सहायक शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भुमन्ना कसरेवार यांनी तर आभार प्रदर्शन उमेश डेहणकर यांनी केले.
