
राळेगांव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नॅशनल हायवे क्रमांक ४४ वरील नागपूर ते हैदराबाद या राज्य महामार्ग अज्ञात वाहनाच्या धडकेत एका इसमाचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार दिं २२नोव्हेंबर २०२४ रोज दुपारी दीड वाजता च्या दरम्यान नायरा पेट्रोल पंपा समोर घडली आहे.
अपघात केशव डोमाजी सावरकर वय ६३ वर्ष राहणार दहेगाव येथील मृतकाच्या इसमाचे नाव असून तर दुचाकी चालक प्रवीण खंडाळकर वय ३२ वर्ष हा गंभीर जखमी झाला असून दहेगाव येथील दोघेही रहवासी होते. ते दोघेही दहेगाव येथून वडकी येथे काही कामानिमित्त ते दुचाकी क्रमांक एम एच २९ ए यु ६९२४ या क्रमांकाच्या दुचाकीने वडकी येथे आले होते. त्यांचे काम आटपून ते दहेगाव कडे जात असताना नॅशनल हायवे क्रमांक ४४ वरील किन्ही ते दहेगाव फाट्यावरील नायरा पेट्रोल पंप समोर त्यांच्या दुचाकी ला मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने या धडकेत दुचाकी वर मागून बसलेले केशव सावरकर यांचा जागीच मृत्यू झाला तर पवन खंडाळकर जबर जखमी झाला दुचाकी चालकाचे नाव असून या घटनेची माहिती वडकी पोलीस स्टेशनला मिळताच वडकी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जखमी व मृतकाला करंजी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून या घटनेचा अधिक तपास ठाणेदार सुखदेव भोरकडे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय प्रशांत जाधव, अविनाश चिकराम, निलेश वाडे ,किरण दासरवार,हे करीत आहे
