नेताजी विद्यालय राळेगाव येथे बँक व्यवहार मार्गदर्शन

सहसंपादक: रामभाऊ भोयर

दि 7 फेब्रुवारी रोजी नेताजी विद्यालय राळेगाव येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत बँक व्यवहार मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. मुख्य मार्गदर्शक म्हणून यवतमाळ जिल्हा को ऑपरेटिव्ह बँक शहर शाखा राळेगाव चे व्यवस्थापक श्री अनुप केंढे हे होते तसेच त्यांचे सहकारी अमर ठाकरे, उपस्थित होते, अनुप केंढे यांनी विद्यार्थ्यांना खात्याचे प्रकार, व्याज आकारणी के वाय सी इत्यादी विषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच पैशाची बचत का महत्वाची आहे याची माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा आर्थिक विषयाशी संबंधित प्रश्न विचारले त्यावर उत्तरे जाणून घेतली उपरोक्त कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक ओंकार सर, सहायक शिक्षिका एम ऐ केवटे, आर डी सिडाम, एम डी सोनोने, व्ही आर कुबडे कु एम बी नागरे, कु एस बी वानखडे हजर होते तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक पी इस वासेकर यांनी केले.