
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव शहरातील गोर _गरीब , सर्वसामान्य नागरिक , महिलांभगिनींचा आजही हक्काच्या घरासाठी संघर्ष सुरू आहे .शासन निर्णय असताना त्यांना घरकुल चा लाभ मिळत नाही ,या बाबत वारंवार मागणी करूनही कोणताही निर्णय घेण्यात न आल्याने राळेगावकर नागरिक शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांच्या नेतृत्वात एकत्र आले .अतिक्रमित जागेवरील पट्टे तातडीने देण्याच्या मुख्य मागणीसह इतर जनहित मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. मागण्यांची पूर्तता न झाल्यास धरणे आंदोलन व आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. या वेळी बाळु धुमाळ, दिलीप कन्नाके, प्रकाश खुडसंगे, देवराव नाखले गिरीधर जी ससनकर, दीपक कोडापे, दिनेश करपते, निलय घिनमीने, अनिकेत भलमे , देवा पांडव, गजानन बोभाटे, संतोष धांदे, अन्वर भाई पठाण थेंम, कवडू जुनघरे, अशोक कोल्हे, योगेश मलोंडे, आकाश कुरसंगे, प्रभाकर एकुणकर, भाजपाले काका, उमेश मेश्राम,प्रभाकर धोटे, महादेव लंबाडे, विशाल धनकसार, कैलास धतकर , प्रभाकर येणोरकर,अनिल राऊत, अनिल फरकाडे, शंतनु सहारे, गोवर्धन कठाने, सतीश बोरवार, विजय चौधरी, सैय्यद अजगर अली, संजय सातपुते, कुंदन कडू, निखील करडवार, यांच्या सह नागरिक उपस्थित होते .
