
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वर बाभूळगाव वरून वडकी मार्गे निझामाबाद येथे मजूर घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टर ला भरधाव वेगात येत असलेल्या कंटेनर ट्रक ने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ट्रॅक्टर पलटी झाल्याने यात दोन मजुर गंभीर जखमी झाले तर २ सुखरूप बचावले. सदर घटना आज गुरुवार दि २९ डिसेंबर रोजी सकाळी ६.३० च्या सुमारास वडकी पो,स्टे हद्दीत येत असलेल्या सिंगलदीप फाट्याजवळ घडली.
निझामाबाद येथील मजूर बाभूळगाव येथून वडकी मार्गे ट्रॅक्टर ने आपल्या गावी जात होते. राष्ट्रीय महामार्गावरील सिंगलदीप फाट्याजवळ मागाहून भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनर ट्रक क्र एन एल ०१ ए.एफ १४५४ च्या चालकाने ट्रॅक्टर क्र टी, एस १६ इ.व्ही ३४५२ या क्रमांकाच्या ट्रॅक्टर ला जोरदार धडक दिली यात ट्रॅक्टर महामार्गावर पलटी झाला यामध्ये चालकासह ३ मजूर प्रवास करीत होते यात शेख रुस्तम वय ५० रा निझामाबाद,शेख असलम वय २२ रा निझामाबाद यांना हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली तर दोन जण सुखरूप बचावले.
अपघाताची माहिती मिळताच वडकी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव,पोलीस नाईक विलास जाधव,अविनाश चव्हाण,चालक विनोद नागरगोजे, यांनी घटनास्थळी धाव घेतली.अपघातग्रस्त ट्रक आणि ट्रॅक्टरला जेसीबीच्या साहाय्याने बाजूला करत महामार्गावरील वाहतूक सुळळीत करून जखमींना तात्काळ उमरी येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले.व अपघातग्रस्त वाहनाला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
