
सहसंपादक : रामभाऊ भोयर
स्थानिक श्रमशक्ती भवन यवतमाळ येथे कॉ.गुलाबराव उमरतकर(राज्य कौंसिलर,किसान सभा) यांचे अध्यक्षतेखाली भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे त्रैवार्षिक तालुका अधिवेशन उत्साहात संपन्न झाले अधिवेशनाचे उद्घाटन कॉ. विजय ठाकरे (जिल्हाध्यक्ष ,आयटक) यांनी केले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन कॉ.सुनिल गेडाम(राज्य कौन्सिलर,भाकप),काॅ.हिम्मतराव पाटमासे, सचिव मंडळ सदस्य) ,कॉ.दिलीप महाजन(तालुका सचिव भाकप , नेर) उपस्थित होते याप्रसंगी अनेक विषयांवर चर्चा करण्यात येवून पक्षाचे सभासद वाढविणे,शाखा बांधणे,पक्षाच्या तालुका जनआघाड्यां कार्यान्वित करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरले.याप्रकारे नविन तालुका कौंसिलने पुढील तीन वर्षांचा कृती कार्यक्रम अधिवेशनात मांडला व सर्वांनी तो एकमताने मंजुर केला.शेवटी नविन तालुका कौंसिल निवडण्यात आली त्यामध्ये कॉ.ईश्वर दरवरे यांची तालुका सचिवपदी फेर निवड करण्यात आली तर सहसचिवपदी १)कॉ.ॲड.अरूण जवके २) कॉ.ज्योती रत्नपारखी ,तर कोषाध्यक्ष कॉ.विजया वडतकर व तालुका कार्यकारिणी सदस्य म्हणुन कॉ.हींमत पाटमासे, कॉ.संजय भालेराव,कॉ.दिवाकर नागपुरे,कॉ.गया सावळकर,कॉ.विजय ठाकरे,कॉ.ममता पाटील, कॉ.किशोर सालपे, ११ लोकांची तालुका कौन्सिल निवडण्यात आली यावेळी पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
