
प्रतिनिधी ढाणकी.:प्रवीण जोशी.
संकट आसमानी असो के सुलतानी, पोटासाठी घराबाहेर पडावेच लागते. शेतात राबवच लागते हातावर पोट असलेल्या मजूर पाऊस असो की थंडी असो व ऊन असो संकटात ही शेत शिवारात राबत आहेत. परिस्थितीने सर्वांना भयभित केले असली तरी मजुरांना घाबरून कसे चालेल, शेतात राबले नाही तर चूल कशी पेटणार, अशा व्यथा शेतात राबणारे मजूर व्यक्त करीत आहेत.
परराज्यातून काहीं ठिकाणी मजूर परिसरात येत असून हातावर पोट असलेल्या गाव खेड्यातील मजूरा सोबत राबतांना दिसत आहे. सध्या शेतशिवारात खरीप हंगामाची कापणी सुरू असून रखरखत्या उन्हात मजूर काम करीत आहेत. परिसरातील काही भागात पर राज्यातून सुद्धा मजूर वर्ग आलेला आहे. अशा मजूर वर्गांना घरी असलेल्या चिल्या पिल्ल्यांची चिंताही सतावत आहे. शेतात राबताना सकाळच्या वेळी गारवा असून दुपारी उन्हाचे चटके बसत असल्याने आरोग्याची काळजी घेत भीतीच्या सावटात मजूर वर्ग राबत आहे. शेतात राबणाऱ्यांमध्ये महिलावर्गही मागे नाही, गरिबी पुढे ऊन, पाऊस, थंडी काय आहे हे माहित नाही. शेतात राबले नाही तर आम्हाला उपाशी राहावे लागेल. काही झाले तर सरकारी दवाखाना आहे.
आम्ही आजाराला घाबरत नाही घाबरलो तर उपाशी राहावे लागेले, यासाठी सरकारने मला मदतीचा हात द्यावे पण त्यात कुटुंबाचा गाढा ओढायचा कसा शेतात राबवूनच दोन घास पोटात जातील वर्षभर राबणे हेच आमच्या नशिबी असल्याचे यांनी सांगितले यामुळे आम्हाला काम केल्याशिवाय पर्याय नाही. यासाठी शेतीचा आधार असून मजूर शेतात राबला नाही तर शेतातील धान्य शेतकऱ्यांच्या घरी पोहोचणार नाही. मजुरांना काम केल्याशिवाय पोटाला पोटभर अन्न मिळणार नाही. संकट कोणतेही असे टिचभर पोटासाठी सामना करावाच लागतो. शासनाने विविध योजना जाहीर केल्या तरी या योजनेचा लाभ अनेक मजुरांना मिळत नाही. त्यामुळे शेत मजुरांना शेतात राबण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येत आहे.
