
सहसंपादक:- रामभाऊ भोयर
नशा मुक्त भारत अभियान पंधरवडा अंतर्गत समाज कल्याण विभाग यवतमाळ व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने प्रथम एज्युकेशन राळेगाव येथे व्यसनमुक्ती मार्गदर्शन, पोस्टर प्रदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मेघाशामजी चांदे मामा, यांनी व्यसनामुळे माणूस माणूस पण हरवतो. नशा या शब्दाला उलटे वाचले तर शान होते.शान राहायचं असेल तर नशेपासून दूर राहण्याचा संदेश चांदे मामा यांनी दिला. प्रमुख वक्ते एड. रोशनी वानोडे (सौ कामडी) यवतमाळ जिल्हा संघटक नशाबंदी मंडळ महा.राज्य यांनी व्यसनाचे दुष्परिणाम सांगून उपाययोजना सांगितल्या.प्रथम एज्युकेशन राळेगाव अमोल सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील बोरकर यांनी केले आभार प्रदर्शन श्री.तंतरपाले यांनी केले. विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची पत्रक वाटप करण्यात आले, अनुष्का धुमाळ, विद्यार्थी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. व्यसमुक्तीची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
