मल्टीस्टेट पतसंस्थेच्या बेदरकार वागणुकीमुळे ग्राहक हैराण तर काही ठिकाणी रक्कम देण्यास टाळाटाळ अवसाणात निघण्याची लक्षण?


प्रतिनिधी::प्रवीण जोशी


ढाणकी शहरातील गुंतवणूकदारांची रक्कम अजून पर्यंत मिळाली नाही निवेदन दिले पोलिसात जाऊन न्यायालयाच्या दरवाजा ठोठाऊ अशा प्रकारचे नाना तराचे प्रयोग करून पाहिले पण यंत्रणा मात्र बेसरम होऊन बसली आहे. कुठल्याही प्रकारची भीती व ग्राहकांची सहानुभूती या मल्टीस्टेट वाल्यांना राहिलेली दिसत नाही बाहेर शहरातून येऊन यंत्रणा उभी करायची इथेच पैसा गोळा करायचा व स्थानिक लोकांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात ठेव स्वीकाराची आम्ही मोठ्या प्रमाणात कर्ज देतो असे सांगत सुटायचे आणि मोठेपणा व खुशामत आपलीच करायची यांनी कुठे स्वतःच्या संपत्तीतील काही भाग शहरातील पतसंस्थेत गुंतवणूक करून कर्ज दिले का? तर तुमचं तुम्हाला खटपट दरवेशी लोकाला अशी गत यांची दिसते. स्थानिक मंडळी संस्थेत सल्लागार म्हणून त्यांची नावे असताना त्यांनी याबाबत ग्राहकांच्या हितास्तव काही पावले उचलणे महत्त्वाचे आहे या व्यक्तींना बघूनच ग्राहक सुद्धा गुंतवणूक करत असतो एका मल्टीस्टेट मधील रक्कम आत्तापर्यंत ग्राहकाला मिळायला तयार नाही ज्या ग्राहकांनी रक्कम गुंतवली असेल ते भविष्यात योग्य कामासाठीच खर्च होईल हाच उद्देश ठेवून रक्कम गुणतवली असेल असे असताना तारखे नंतर तारखा एवढेच, कोणी शुभकार्यासाठी ही रक्कम किंवा एखादा व्यक्ती आजारी पडला तर ही रक्कम वेळेवर कामी पडत नाही आणि स्वतःचीच रक्कम ग्राहकाची परक्याची झाली ढाणकी शहरात ही यंत्रणा ग्राहकाच्या जीवावर बादशाहा बनली व कैफ चढला तसेच माहिती पडले ग्राहकांना जास्त व्याजदराचा मोह दाखवला म्हणजे ही मंडळी रक्कम गुंतवतात आणि सर्वसामान्यानी अशा लुटारू टोळीजवळ रक्कम गुंतवने थांबवले पाहिजे. ज्या ग्राहकांनी आपली रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवली व ती पूर्ण झाली ते आता या ठिकाणी पुन्हा गुंतवणूक करायला तयार नाही तेथील “आम्ही व मी तिथे आहे, आहोत” म्हणणारी यंत्रणा गुंतवनुक कायम ठेवण्यासाठी ग्राहसमोर गोंडा घोळत असल्याचेही बोलल्या जात आहे फक्त तेथे काम करणारे डोकेच तिथं दिवसभर दिसतात आणि दैनंदिन अभिकर्ता यांनी वसूल करून आणलेली रक्कम या शिवाय कुठलाही व्यवहार होताना दिसत नाही या येणाऱ्या काही महिन्यात कोणते व कशा प्रकारचे सोहळे ग्राहकाला बघायला मिळतील हे येणारा काळच ठरवेल

मल्टीस्टेटवाले सांगत आहे की आमच्याकडे तत्पर यंत्रणा आहे थोडी जरी रकमेची अफरातफर झाली की लगेच यंत्रणेद्वारे आम्हाला माहित पडते एवढी यंत्रणा सक्रीय असताना एका आरडी एजंट ने सर्वसामान्याच्या रकमेवर डल्ला मारला मग संबंधित मल्टीस्टेट पतसंस्थेची यंत्रणा नेमकी काय करत होती त्यांना ग्राहकांचे किती हित आहे यावरून दिसते त्यांचे वसुली पथक येऊन गेले पण त्यांनी कोणती ग्राहकाचे काळजी घेतली व त्यांच्या रक्कमेचे काय झाले हे सांगण्याचे धाडस कधी त्यांच्या “सुप्रीमो” ने घेतलेले दिसत नाही त्यांच्या वरिष्ठांनी शहरात येऊन ग्राहकाप्रती सहानुभूती व्यक्त केली नाही किंवा कोणत्याही प्रकारे आश्वासित केले नाही त्यामुळे ग्राहकांनी आता सज्जग राहून गुंतवणूक करणे महत्त्वाचे ठरत आहे. एवढे सगळे असताना जे प्रामाणिकपणाने काम करतात आहे त्यांच्यावर जनतेचा विश्वास कायम आहे. तर स्थानिक लोकांना कर्ज देताना संबंधित यंत्रना मोठ्या प्रमाणात चौकशी करत असते जमानतदार त्यांचे कोरे चेक व इतर तस्सम बाबी. स्थानिक लोकांनी इथल्या पतसंस्थेला ठेव ठेवून मोठे केले असताना कर्ज देण्यास टाळाटाळ करणे त्याला अडथळे आणणे व अतिरिक्त कागदपत्रे सांगून हैराण करून कर्जापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न असतो असे एका ठिकाणी केल्या जात असल्याचे बोलल्या जाते तर दुसरीकडे मात्र परप्रांतीयांना मात्र कर्ज दिल्याची कुंनकुन असताना आता त्या बाबीचा गवगवा होऊ शकतो असे तेथील यंत्रणेला वाटत असताना त्या कर्जाची रक्कम पूर्णपणे भरून तेथील “बुडबुडे लोटालोंढे” कायमचे बंद केले? अशी “दहाजनात” चर्चा होती.तेव्हा ही ठिकाणं ग्राहकांसाठी लुटारू चुडेल ठरत आहेत.??

सर्वसामान्य व्यक्तीने कर्जाची मागणी केली असता अनेक चौकशा केल्या जातात एवढेच कशाला यांच्याकडून कर्ज नसल्याबाबतचे प्रमाणपत्र आणायचे असल्यास त्या वर ठप्पा मारून देतांना तसं कुठल्याही प्रकारचे कर्ज असल्यास तसे हक्क कायम ठेवून असे नमूद असते मग ग्राहकांचे हित मात्र जोपासले जाताना दिसत नाही. आरडी हे एजंट ने सायकल टॅक्सीवाल्याच्या रकमेवर त्याच्या माघारीच थांग पत्ता लागू न देता कर्ज काढलं व त्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला अखेर शेवटी त्याला नुकसान झालेल्या स्वरूपातील रक्कम काढून समाधान मानावे लागले असे ऐकिवात आहे. एवढे सगळे असताना पतसंस्थेतील बसलेल्या एकाही “ऊपरवाल”व त्याच्या यंत्रणेने साधी भेट सुद्धा ग्राहकांना दिली नाही यावरून ग्राहकाची किती काळजी या ठगसेन यंत्रणेला आहे हे प्रकर्षाने दिसते. म्हणूनच की काय सध्या मल्टीस्टेटची परिस्थिती अशी आहे की फक्त आर डी एजंट वाल्यांनी आणलेल्या रकमेवर सध्या ही यंत्रणा कार्यरत असून ग्राहक इथ कोणत्याही प्रकारचे व्यवहार करायला तयार नाही मार्च महिना झाल्यानंतर एका पतसंस्थेने गेट टुगेदर चा कार्यक्रम ठेवला असताना डिपॉझिट साठी चेल्या चपाट्याना कानपीचक्या दिल्यानंतर त्याने “आस्ते कदम पावले” ठेवीदाराकडे वळविले पण ग्राहकांनी मात्र ठेव स्वरूपात भीक घातली नसल्याचे बोलल्या जात आहे तर त्यांना स्वतःची संपत्ती विकून नोकरी वाचविण्याची नामुष्की येत असल्या कारणाने केवळ काही दिवस रक्कम ठेऊन लगेच काढून घेतली याचा अर्थ काम करणाऱ्या यंत्रणेलाच रक्कम राहील का नाही असे वाटत असताना ग्राहकाने यांच्यावर का विश्वास ठेवावा तर साहेबांचा हा कॉम्प्रेसर ने सिलेंडर मधे वायू भरण्याचा एकेकाळचा खेळ कळणार नाही असे वाटले?? स्वतःला तेथील यंत्रणा जर माणिक, मोती,व एटीट्यूड उराशी ठेवत असेल तर तिथे नंदनवन फुलेल? तर काही ठिकाणी सोनेतारण कर्ज म्हणून ठेवलेल्या सोन्यात सुद्धा फेरबदल झाल्याच्या प्रकरणाची चर्चा चवीने चघळल्या जात आहे पतसंस्थेची सभा असल्यास त्या संदर्भात कोणालाही कळविल्या जात नसून परस्पर ही सभा गुंडाळल्या जाते असेही बोलल्या जाते व जो व्यक्ती सभेमध्ये प्रश्न विचारतो किंवा अडचण येईल असे बाजू उपस्थित करतात अशा व्यक्तीला डावल्या जात असल्याचेही सांगण्यात येते त्यांच्या या अशा वागण्यामुळे ग्राहक मात्र आपली रक्कम काढण्यातच धन्यता मानत असून कधी कुठली ठिकाण कोण्याक्षणी पोबारा करेल सांगता येत नाही त्यामुळे ग्राहकाने सजग राहणे जरुरी आहे आणखीन एक आर डी एजंट व पतसंस्था पळून जाऊ शकते की काय असा कायमचा प्रश्न व धाक जनतेलाच पडतो आहे