स्वातंत्र्य व वाढदिवस दिनानिमित्त केले वृक्षारोपण

देवळी तहसील कार्यालयासमोरील झोपडपट्टीमध्ये दि. 15/08/23 ला “मी स्वातंत्र्य दिन बोलतोय” स्वातंत्र्यदिनानिमित्त भारत सामाजिक विकास ग्रुप देवळीच्या वतीने फुटपाथ स्कूलमध्ये ध्वजारोहन , वृक्षारोपण करीत अल्पोहार देऊन साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे काही मान्यवरांनी सांगितले की राष्ट्र हे एक भले कुटुंब आहे प्रत्येक भारतीय हा भारताच्या विशाल कुटुंबाचा सन्माननीय सदस्य आहे जिकडे तिकडे एकच नारा मी स्वातंत्र्य दिन बोलतोय असे म्हणत मनाच्या कप्प्यात आणि विचारांच्या वयात काळजाच्या संदर्भात जतन आत्मविश्वासाने बोलावा सारा भारत वर्ष मनशांतीच्या अति गुजर वाणी गुणगुणावे भारतीय मनाचे पाखरू नवतंत्रज्ञानाचा सशक्त पंखांनी उन्नतीच्या भव्य आकाशात झेप घ्यावी भारत वर्षांनी हिंदू , मुस्लिम , सिक , इसाई, आपस मे है भाई ,भाई हा नारा दिला आणि वृक्षारोपण ही काळाची गरज असून शिक्षिका रेणुका दूरबुडे यांना वाढदिवसनिमित्त वृक्ष भेट देत सर्वांच्या उपस्थितीत वृक्षारोपण केले. त्या कार्यक्रमात आम आदमी पार्टीचे वर्धा जिल्हा सह संयोजक किरण पारिसे , माजी होमगार्ड वरिष्ठ पलटण नायक नरेंद्र जोशी , माजी पलटण नायक दीपचंद भरणे , माणिकराव राऊत , पत्रकार सागर झोरे , गणेश शेंडे , सचिन वैद्य , रवींद्र पारीसे आणि शिक्षिका रेणुका दुरगुडे , सुवर्णा वैद्य , समाजसेविका निर्मलाबाई वैद्य तसेच विद्यार्थी वर्गणी शिंदे , रोशनी शिंदे , प्रतीक्षा पवार , साहिल वाडकर , राज शिंदे , भीमा शिंदे अजय पवार , रतन शिंदे , शिवानी शिंदे , पूजा पवार त्याचप्रमाणे इतर नागरिकांनी सहभाग घेत सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश शेंडे व संचालन सचिन वैद्य आणि आभार सागर झोरे यांनी आभार मानले.