लोकहित महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी: संदीप बी.जाधव
बार्शी निमित्त व शिव रुद्र रूप मानले जाणारे पवनपुत्र हनुमान यांचे बोरगडी तालुका हिमायतनगर मध्ये भव्य दिव्य मंदिर पुरातन काळापासून आहे. जवळपास औरस- चौरस असलेल्या गावामधला शेतकरी वर्ग पाडवा झाल्यावर बारस च्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षी भव्ययात्रा चे आयोजन बोरगड येथील कमिटीने केला आहे. पूर्वी तर दूर-दूरचे शेतकरी आपल्या कुटुंबासोबत बैलगाडीने पोळ्यासारखे बैलांना सजवून गाडी ना डोली सारखे सजवून कुटुंबीयांना ऊन लागू नये म्हणून कपडा झाकून बैलगाडी एका मागून एक रांगेत दूरवरून येत असत. त्याकाळी बैलगाड्यामुळे अतिशय रम्य असा वातावरण निर्मिती होत असत, शेतकरी मंदिराजवळ स्वयंपाका करिता जागा मिळेना म्हणून एकापुढे एक बैलगाडी पळवत असत. त्याकाळी त्या भव्य यात्रेचे महोत्सव अधिक चांगले वाटायचे. एकीकडे मोठा शेतकरी गट यांनी तर सायकल टॅक्सी दोन दिवस आधी बुक करून घरी आणायचे आणि रात्री ग्रुप वाईज जसं सायकल रेस असते तशाप्रकारे मजेत प्रवास करत असत. मंदिराजवळ सायकल लागत असत आणि मंदिराच्या अवतीभवती बैलगाडी त्याच्या पाठीमागे शेतकऱ्यांच्या महिला वर्ग यांनी तर पुरणाच्या पोळ्या बनवत असतात शेतकऱ्यांची मुले मुली रात्री यात्रा व झोके खेळत असत, जवळपास आजूबाजूच्या खेड्यामध्ये बंजारा वर्ग जास्त आढळतो त्यामुळे घागरा चोळी ओढणी घातलेल्या बंजारा बाया यांची टोळी यात्रेत भरून दिसायची, आज तीच प्रथा कार क्रुझर ऑटो व मोटरसायकल यांची भन्नाट गर्दी व आजूबाजूच्या खेड्यातील महिलावर्ग चुलीवरची पुरणाची पोळी आजही तिथे प्रसिद्ध आहे. फॅमिली सोबत सर्वजण पंगत सारखे बसून जेवण करतात. पाडवा निमित्ताने शेतामध्ये जेवण झाल्यावर किती आनंद होतो व बारस निमित्ताने बोरगडी येथे हनुमान जयंतीनिमित्त पुरणाची पोळी खाण्याचा आनंद वेगळाच असतो. त्यानंतर ती मंडळी यात्रा भर फिरून साहित्य खरेदी करून व झोके खेळून आनंद उत्सव साजरा करतात. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सहा एप्रिल रोजी चार वाजता हनुमंतांना नैवेद्य व पूजा केली जाते. जे मनात मानले ते सिद्ध होते, अशी श्रद्धा लोकांमध्ये आहे, बोरगडी येथील हनुमान मंदिर जागृत आहे असं म्हणतात.
