

सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील श्री लखाजी महाराज विद्यालयाचे तत्कालीन अध्यक्ष स्व.शशिशेखर कोल्हे यांचे निधन 18 जानेवारीला झाले होते त्याच धर्तीवर श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात त्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त 18 जानेवारीला स्व. शशिशेखर कोल्हे यांच्या फोटोचे पुजन करून त्यांना सर्व पाहुणे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व उपस्थित पालक, विद्यार्थी बंधू भगिनींकडून सामुहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष दिलीप कोल्हे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष आशिष कोल्हे जेष्ठ संचालक चित्तरंजन कोल्हे, संचालक शेखर झाडे सुरेश गंधेवार दिलीप देशपांडे भरत पाल तर पाहुणे प्रदीप जयस्वाल, सेवानिवृत्त शिक्षक श्रावणसिंग वडते सर विलायतकार महाराज मंचावर उपस्थित होते.त्यावेळी अध्यक्ष दिलीप कोल्हे यांनी स्व.शशिशेखर कोल्हे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याला उजाळा देत आपण सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला पाहिजे असे मत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षक रमेश टेंभेकर यांनी केले तर आभार जेष्ठ शिक्षिका सौ.वंदना वाढोणकर यांनी मानले.त्यांनतर दुसऱ्या पर्वात शिक्षक पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्या मेळाव्याचे अध्यक्ष वरूड जहांगीर येथील पालक किरण निमट हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक चित्तरंजन कोल्हे हे उपस्थित होते या मेळाव्यात विद्यालयाचे प्राचार्य विलास निमरड यांनी शाळेच्या प्रगतीचा व सोई सुविधाची माहिती पालकांना दिली.या मेळाव्यात विद्यालयाचे पर्यवेक्षक दिंगाबर बातुलवार यांनी यांनी सुध्दा मार्गदर्शन केले तसेच विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक मोहन बोरकर सरांनी सुद्धा पालक म्हणून पालकांची जबाबदारी काय हे सरळ आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले.शेवटी सर्व मान्यवर व पालक, सरपंच, प्रत्येक गावातून आलेले शिक्षक समिती सभापती यांचे आभार मानले.त्यांनतर वर्धा येथील प्रसिद्ध प्रबोधनकार इंजिनिअर भाऊसाहेब थुटे यांनी प्रबोधनाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रावर आधारित मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी 19/1/2026 रोज सोमवारला सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ संचालक चित्तरंजन कोल्हे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष दिलीप कोल्हे, संचालक दिलीप देशपांडे भरत पाल शेखर झाडे सुरेश गंधेवार प्रदीप जयस्वाल पोलिस पाटील प्रशांत वाणी गंगाधर वाणी सत्कारमूर्ती विश्राम ढोले, योगिनी ढोले सुनील उंबरकर वंदना उंबरकर नंदिनी देशपांडे सुनील देशपांडे उपस्थित होते.या सत्कारमूर्तीनी विद्यालयाला वाॅटर फिल्टर भेट म्हणून दिले.हे सर्व सत्कारमूर्ती विद्यालयाचे शाळा ओपनिंगचे मुख्याध्यापक विष्णुपंत ढोले सर यांचा परिवार होता.ढोले सरांनी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे मोठा वटवृक्ष झाल्याचे पाहून ढोले परिवारांनी आनंद व्यक्त केला. सोबतच त्यांनी काही जुन्या आठवणींना उजाळा दिला.त्यांतर सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.सास्कृंतिक कार्यक्रमाची झालेल्या सुरवातीचा 20/1/2026 रोजी तीन वाजता समारोप झाला या सांस्कृतिक कार्यक्रमात लखाजी इंग्लिश मिडीयम स्कूल व सर्व पाच ते बाराव्या वर्गातील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.त्यांतर दुपारी ठिक तीन वाजता सर्व विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले.या सर्व कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापकाच्या उपस्थितीत करण्यात आले होते या कार्यक्रमाला मुख्याध्यापक विलास निमरड, पर्यवेक्षक दिंगाबर बातुलवार, जेष्ठ शिक्षक रमेश टेंभेकर, रंजय चौधरी, सौ कुंदा काळे मॅडम,सौ वंदना वाढोणकर मॅडम,राजेश भोयर, मोहन आत्राम, मोहन बोरकर, विशाल मस्के, वैशाली सातारकर मॅडम, एन्नावार मॅडम, अश्विनी तिजारे मॅडम, राहुल तुळणकर सर, अंकित कंधारकर सर ,शुभम मेश्राम सर, वाल्मिक कोल्हे,पवन गिरी, बाबुलाल येसंबरे, विनोद शेलवटे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
