
महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव
आज दिनांक 05/06/2023 सोमवारला महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील नागरिकांनी गटविकास अधिकारी महागाव यांची भेट घेऊन फुलसावंगी ग्रामपंचायतने राज्य सरकारचा 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त गावातील सामाजिक कार्य करणाऱ्या दोन महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्याचे निर्देश दिले होते.परंतु शासनाचा आदेश असताना सुद्धा फुलसावंगी ग्रामपंचायतने हा पुरस्कार अद्याप पर्यंत दिला नाही. त्यामुळे सरपंच सचिव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी.असे निवेदन फुलसावंगी येथील माजी उपसरपंच अमरदीप दळवे,तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष समशेर खान, भगवानराव उर्फ बाळू नाईक,याकूब खान पठाण,रवींद्र पांढरे आदी नागरिकांनी दिले.
