ग्रामीण रुग्णालय राळेगाव निशुल्क रोगनिदान व उपचार शिबीर आज शनिवार 7 ऑक्टो. ला आरोग्य शिबीर,रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

   

राळेगाव तालुक्यातील गोर -गरीब रुग्णांना ग्रामीण रुग्णालय हा हक्काचा एकमेव आधार आहे. या ठिकाणी आयुष्यमान योजने अंतर्गत आरोग्य शिबीराचे आयोजन महिन्याच्या पहिल्या शनिवारी करण्यात येते या अंतर्गत दि.7 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आरोग्य शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधिकारी वदंना महाजन यांनी केले. शिबीरात मोफत तपासणी व इलाज करण्यात येणार आहे.
आरोग्य शिबीरात पोषण आहार सप्ताह प्रदर्शनी या मध्ये गरोदर मातांचा आहार, घ्यावयाची काळजी, बाळाची निगा या बाबत इत्यभूत माहिती देण्यात येईल. डिसेंबर महिन्यापर्यंत हे शिबीर महिन्याच्या पहिल्या शनिवारी आयोजित करण्यात येईल. यात स्त्री रोग तज्ञ, डेंटिस्ट व विविध आजारावरील तज्ञ डॉक्टर मार्गदर्शन, उपचार करणार आहे.
राळेगाव ग्रामीण रुग्णालयात परिसरातील लहानमोठ्या गावातील सेकडो रुग्ण येत असतात. उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळण्याची मागणी सातत्याने होत असते. रिक्त पदाचे दुखणे ही समस्या आहेच.वैद्यकीय अधिकारी 2 नर्स ची 2 पदे, वॉर्ड बॉय ची 2 पदे, औषध निर्माण अधिकारी 1 ही पदे रिक्त आहे. उपलब्ध यंत्रणाच्या माध्यमातून सेवा देण्याचे कामं सुरु असले तरी महत्वाच्या या रुग्णालयाकडे लक्ष देण्याची गरज आहे.


ग्रामीण रुग्णालयात राळेगाव सह तालुक्यातील जवळपास च्या गावातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात.400ते 500 ची इथली रोज ची OPD असते. रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळायला हवी असा आमचा प्रयत्न असतो. आयुष्यमान भव योजने अंतर्गत शनिवार ( दि.7 ऑक्टॉबर ) रोजी होणाऱ्या आरोग्य शिबीराचा रुग्णांनी लाभ घ्यावा या वेळी तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहे. या शिबीरात निशुल्क निदान,उपचार, औषधी व आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.


-डॉ. वदंना महाजन
वै. अधीक्षक ग्रा. रु. राळेगाव