
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव ग्रामीण: राळेगाव तालुक्यातील खैरी येथे २६ जानेवारी पासून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खैरी ग्रामपंचायत च्या वतीने खेळ, क्रीडा व चार दिवसीय शालेय सांस्कृतिक कला महोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. २२ते २४ जानेवारीपर्यंत शालेय खेळ व क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या तसेच सांस्कृतिक कार्यक्रम २६ जानेवारीपासून सुरू होऊन २९ जानेवारी असा चार दिवसाचा सांस्कृतिक कला महोत्सव होता परंतु दोन दिवसाचे सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे व तीन दिवसाचा दुखवटा असल्यामुळे पुढील दोन दिवसाचे कार्यक्रम २ते ३ फेब्रुवारी रोजी घेण्यात आले त्यात अजित दादांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या खेळ क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचे उद्घाटन वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरखेडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सरपंच श्रीकांत राऊत ग्राम विकास अधिकारी जयश्री पाटील तसेच ग्रामपंचायत चे सर्व सदस्य व सर्व शाळेचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपस्थितीत होते.
या तीन दिवसीय खेळ व क्रीडा व चार दिवसीय सांस्कृतिक कला महोत्सवांमध्ये खैरी गावातील चारही शाळेचे विद्यार्थी तसेच अंगणवाडी व कॉन्व्हेंट च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद उच्च माध्यमिक केंद्र शाळा, प्राथमिक कन्या शाळा, लोक विद्यालय, यशवंत विद्यालय तसेच कॉन्व्हेंट व अंगणवाडी सहभागी झाल्या होत्या. या सांस्कृतिक कला महोत्सवामुळे खैरी गावातील नागरिकांना शालेय विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण व कला पहावयास मिळाल्या तसेच सर्वच शाळेच् विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल् ल्या कलागुणांनी नागरिकांना मनमोहीत केले. हे सांस्कृतिक कार्यक्रम चारही दिवस रोज संध्याकाळी सुरू होत होते व रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत चालत होते. या सांस्कृतिक कार्यक्रमात चिमुकल्यांनी आपल्या कलागुणांनी गावाकऱ्यांना मनमोहीत केले.या कार्यक्रमांना गावातील नागरिकांकडून प्रेक्षकांकडून भरपूर असा प्रतिसाद मिळाला. विशेष करून जिल्हा परिषद कन्या शाळा च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी खैरी ग्रामवासियांची मने जिंकली तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा यांनीही प्रेक्षकांना मनमोहीत केले तसेच लोक विद्यालय यशवंत विद्यालय अंगणवाडी कॉन्व्हेंट च्या मुलांनीही आपले अंगचे कलागुण दाखवले.
या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये बालचिमुकल्या कलावंतांनी सर्व प्रेक्षकांना नृत्य व नाटिका व भारुड सादर करून गावकऱ्यांची मने जिंकली. 3 फेब्रुवारी रोजी खेळ क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे समारोप राळेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी केशव पवार यांच्या हस्ते सर्व शाळा अंगणवाडी व कॉन्व्हेंट ला ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले तसेच या कार्यक्रमात खैरी गावातील सात पत्रकारांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात गटविकास अधिकारी यांनी खैरी ग्रामपंचायतचे खेळ क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम घेतल्याबद्दल अभिनंदन व कौतुक केले व तालुक्यात ग्रामपंचायत द्वारे अशा पद्धतीचे आयोजन करणारी खैरी ग्रामपंचायतच आहे असे सांगितले. ह्या कार्यक्रमाचे आयोजन खैरी ग्रामपंचायत ने केले असून त्यांनी हे कार्यक्रम साजरे होण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायतचे सरपंच श्रीकांत राऊत, ग्रामविकास अधिकारी जयश्री पाटील सदस्य रवींद्र निवल, प्रमोद बोडे, सदस्या सौ. लता पवार, सौ. रमा वनकर, सौ . सरला गवारकर व शीतल दोडके तसेच ग्रामपंचायत कर्मचारी राहुल मानकर ,स्वप्निल गोपने, विशाल पाटील, बंटी फुलकर ,आकाश शिरसागर यादी अथक परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले.
