कापूस कोंडया ची गोष्ट सांगणारा काचूरी चित्रपट रिलीज ( राळेगाव येथे शेतकरी कुटुंबाला दिला मान )

सहसंपादक: रामभाऊ भोयर

   

यवतमाळ जिल्ह्यातील कलावंत, शेती व शेतकऱ्यांची व्यथा मांडणारे कथानक, राळेगाव तालुक्यात झालेले चित्रीकरण ही वैशिष्ट्य असणारया काचूरी या चित्रपटाची सर्वत्र चर्चा झाली. गोवा इंटरनेशनल फिल्म कॉम्पिटिशन मध्ये बेस्ट ड्रामा म्हणून या चित्रपटाची घेतल्या दखल घेतली गेली. हा चित्रपट आज (दि. 6एप्रिल ) ला राळेगाव येथे रिलीज करण्यात आला. विशेष म्हणजे शेतकऱी दांपत्याच्या हस्ते चित्रपट रिलीज करण्यात आल्याने एक वेगळी उंची या निमित्ताने गाठल्या गेली.
शेतकरी विजय पाल व त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वऱी पाल यांच्या हस्ते चित्रपट रिलीज करण्यात आला.त्यांच्या पत्नी शेतकऱ्यांच्या अडचणी जवळून समजून घेताना या सर्व अडचणीचे मूळ कारण काय आणि त्यावर चित्रपटातून भाष्य केल्यास पोशिंद्याच्या व्यथा व्यवस्थेला ठळकपणे कळतील आणि पुढे शेतकऱ्यांच्या जगणं सुकर होण्यासाठी समाज स्थरावर तसेच सरकार दरबारी प्रयत्न व्हावेत या विचारातून ” काचूरी “या चित्रपटाची निर्मिती झाली . शेतकऱ्याच्या उध्वस्त वर्तमानातील वस्तुस्थिती, या वेदनेतून जन्मास आली एक उत्तम कलाकृती तीच नाव “काचुरी” .गोवा इंटरनॅशनल फिल्म कॉम्पिटिशन,मध्ये बेस्ट सोशल ड्रामा हे मानाचे नामांकन मिळाले .हे शिवधनुष्य लीलया पेललेल्या या अवलियाचे नाव आहे कपिल श्यामकुंवर .जो या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि निर्माता आणि कलावंत आहे. विशेष म्हणजे यातील सारेच्या सारे कलाकार यवतमाळ जिल्ह्याच्या मातीतील आहेत.

काचुरी या चित्रपटाला यासोबत ISCA या फिल्म फेस्टिवल मध्ये तीन मानाचे पुरस्कार मिळाले आहेत ज्यात बेस्ट स्टोरी ,बेस्ट फिल्म ,बेस्ट एक्सपेरिमेंटल फिल्म 2023 असे अवॉर्ड मिळाले आहेत त्यामुळे राळेगाव तालुक्यात आनंदाला उधान आले. काल दिवसभर सोशल मीडियावर काचुरीचीच धूम होती.त्याला कारणही तसेच होते, यातील बहुतांश कलाकार राळेगाव तालुक्यातील आहेत. विशेष म्हणजे तुमच्या आमच्यातील आहेत. ज्यांनी कधीही कॅमेरा फेस केला नसेल त्यांच्यातील सुप्त गुणांना यामुळे वाव मिळाला. शेती मातीशी नाळ जुळलेली सर्व कलावंत शेतकरी पुत्र असल्याने आमचं दुःख अडचणी आम्हीच मांडू आणि त्या अडचणीचे कारण आणि त्यावरचे उपाय व्यवस्थेला सांगू असं ठरवलं आणि आपल्या वैदर्भीय भाषेत काचुरींच्या चित्रपटाची निर्मिती केली यातील युवा शेतकऱ्याची मुख्य भूमिका निभावली ती कपिल श्यामकुंवर यांनी. राळेगाव तालुक्यातील गुड्डू मेहता, जितेंद्र कहूरके, गीता पढाल ,श्रद्धा गुरनुले ,कोमल नारनवरे ,मंगेश पुडके , अंकुश मुनेश्वर, दुर्गेश गुरनुले ,स्वप्नील वटाणे, मयूर वटाणे ,बाबाराव पोटे गणेश गुरणुले विजय नारनवरे आदींनी यात दर्जेदार अभिनयाचा ठसा उमटवला. या चित्रपटाचे चित्रीकरण तालुक्यातील शेळी, धानोरा, राळेगाव परिसरात झाले. कुठलेही नाट्य पार्श्वभूमी नसतांना सर्व कलावंतांनी त्यांच्यातील कलावंत जिवंत उभा केला आपल्या आजूबाजूला असणारा शेतकरी कुठल्या विवंचनेत असतो त्याचे अर्थकारण कसे असते त्याचे आयुष्य रेखाटण्याचा हा छोटा प्रयत्न शेतकरी पुत्रांनी या कलाकृती मध्ये एकत्र येत केला आहे .
अंत्यत कमी संसाधनामध्ये, स्थानिकांच्या सहकार्याने चित्रपटासारखा विषय हाताळण्यात आला.चार मानाचे पुरस्कार “काचुरी” फिल्म च्या वाट्याला सुरवातीलाच आल्याने तॊ पुढील अनेक फिल्म फेस्टिवल मध्ये आपल्या विषयावरून आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन व्यवस्थेला प्रश्न विचारत उभा असेल .

     


कापूस उत्पादक शेतकऱ्याची व्यथा हे कथासूत्र


कापूस निघाल्यावर फांदीवर उरते ती काचुरी, विदर्भातील शेतकऱ्यांच्या हाती देखील खर्च वजा जाता ही काचुरी व तिची टोचणी उरते असा आशय घेउन ही काचुरी आपल्यासमोर येते. यातील शेतकरी हा अल्पभुदारक आहे. तॊ शिक्षित आहे. त्याला दोन मुली आहेत वंशाचा दिवा मुलगाच हवा या विचाराचा तॊ नाही. त्याला पत्नीची साथ आहे .मात्र व्यवथा कशी असते ती कशी प्रश्न आणि आव्हान उभे करते यावर चित्रपटाचे कथानक पुढे सरकते रोजचे जगणं कठीण असलं तरी आशा सोडू नका उद्याचा दिवस आपला आहे असं सांगत असतानाही चित्रपट अनेक प्रश्न समाजाला व्यवस्थेला विचारते.


खरं तर या चित्रपटात वेगळं असं काही नाही. कापूस उत्पादक पट्यातील या घटना नित्याच्या आहे. पत्रकारिता क्षेत्रात, इलेक्ट्रॉनिक मीडियात कामं करतांना तीन मिनिट वा वेळेच बंधन असत. नापिकी, कर्जबाजारीपणा हा मोठा विषय आहे त्या करीता व्यापक स्थरावर काहीतरी करावं यातून काचूरी चा जन्म झाला आहे. कोणतेही व्यावसायिक प्रशिक्षण नसतांना स्थानिक कलाकारांनी यात उत्कृष्ट अभिनय केला आहे. तांत्रिक वा इतर बाबीसाठी आम्ही कमी पडलो असे होऊ शकते. यात ज्या कमतरता असतील त्या माझ्या आहेत जे चांगले असेल ते सर्व यश या साठी मेहनत घेणाऱ्यांचे आहे. संकट आहेतच यात दुमत नाही मात्र त्यावर मात करून पुढे जाने हा आशावाद मला महत्वाचा वाटतो.


कपिल श्यामकुंवर
दिग्दर्शक / अभिनेता

यवतमाळच्या मातीत तयार झालेला यवतमाळच्या कलावंतांचा आणि शेतकर्यांचा जीवनावर आधारित चित्रपट ” काचुरी ” हा मराठी लघुपट आज राळेगाव येथे रावेरी येथील महिला शेतकरी सौ. ज्ञानेश्वरी विजय यांच्या हस्ते आज Aanandi Films या YouTube चॅनल वर रिलीज करण्यात आला आहे.
यावेळी सौ. ज्ञानेश्वरी पाल आणि त्यांचे पती विजय पाल तसेच मा. शिक्षक मनीष भाऊ काळे आणि चित्रपटाचे कलावंत गुड्डूभाऊ मेहता तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक कपिल शामकुंवर, स्वप्नील वटाणे, दुर्गेश गुरणुले आणि सौ. तेजस्वी मनीष काळे, कु. रिद्धी मनीष काळे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

कपिल शामकुवर गीता पढाल दुर्गेश गुरनुले स्वप्नील वटाणे कोमल नारनवरे. श्रद्धा गुरनुले दिव्या ठाकरे मयूर वटाणे वासुदेव मस्कर प्रज्वल कोल्हे अंकुश मुनेश्वर बाबाराव पोटे योगेश पोटे गणेश गुरनुले बाळू शिंदे जितू कहुरके गुड्डू मेहता मंगेश पुडके प्रमोद ठाकरे प्रफुल वटाणेआकाश बुर्रेवार जनार्धन राठोड विजय नारनवरे विशेष आभार


कवी विजय ढाले आर्णी
कवी किरणकुमार मडावी मोहदा
जेष्ठ पत्रकार काशिनाथ लाहोर